Travel : देशभरात, राज्यात सध्या उष्णतेची लाट अनुभवायला मिळतेय, त्यात शहरातील तो गाड्यांच्या हॉर्नचा कर्कश आवाज...ट्राफिक, शरीरातून घामाच्या धारा आणि कामाचे वाढलेले टेन्शन.. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही सुद्धा हैराण झालात का? मग या सर्वातून तुम्ही काही दिवस ब्रेक घेतलाच पाहिजे, कारण भारतीय रेल्वेने मे महिन्यात खास लेह-लडाख टूर पॅकेज आणलंय, ज्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये सुखद गारवा अनुभवू शकता. सोबतच तुमचं टेन्शनही विसराल..


 


उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थंड ठिकाणी फिरा..


जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थंड ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज लाँच करत आहे. 06 रात्री आणि 07 दिवसांचे हे हवाई टूर पॅकेज 23 मे 2024 ते 29 मे 2024 पर्यंत चालेल. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना लखनौ ते लेह विमानाने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच पर्यटकांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था थ्री स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 


 


23 मे 2024 पासून सुरू होणार टूर 


IRCTC ने उन्हाळ्यात लेह-लडाखला भेट देण्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. IRCTC हे टूर पॅकेज 23 मे 2024 पासून सुरू होत आहे. प्रवासादरम्यान, स्तूपा आणि मॅग्नेटिक हिलला भेट देऊन लेहमधील हॉटेलमध्ये मुक्काम, संध्याकाळी लेह पॅलेस, शांतीस्तुपा, घाटीतील गुरुद्वाराला भेट, नुब्रा व्हॅलीतील कॅम्पमध्ये रात्रीचा मुक्काम, डिस्किट, हुंद आणि तुर्तुक गाव, थांग व्हॅली आणि स्थानिक पॅंगॉंग तलावाचा फेरफटका मारला जाईल.


 


भाडे किती असेल? जाणून घ्या


या टूर पॅकेजची किंमत एका व्यक्तीच्या मुक्कामावर अवलंबून आहे. 60100/- दोन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेजची किंमत रु. 55100/- आणि तीन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी, प्रति व्यक्ती पॅकेज किंमत रु. 54600/- निश्चित केले आहे. प्रति मुलाचे पॅकेज किंमत रु. 53300/- (बेडसह) आणि रु. 48400/- (बेड शिवाय) असेल.


 


प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! अशी करा बुकींग


या संदर्भात माहिती देताना IRCTC कडून सांगण्यात आले की, या पॅकेजचे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. त्यांनी सांगितले की या प्रवासासाठी, लखनौ येथील पर्यटन भवन, गोमती नगर, आयआरसीटीसी कार्यालयात आणि आयआरसीटीसीच्या https://irctctourism.com या वेबसाइटवरून ऑनलाइन बुकिंग करता येईल. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी तुम्ही वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : उन्हाळ्यात दक्षिण भारतात फिरणं योग्य ठरेल का? रिमझिम पाऊस, आल्हाददायक वातावरण इथे भेटेल? 'या' ठिकाणांबद्दल जाणून घ्या