Travel : मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की लोकांच्या घरी बाहेर फिरायला जायचे प्लॅन होतात. अनेकजणांना जिथे थंडावा आणि आल्हाददायक वातावरण असेल अशा ठिकाणी जायला आवडते. त्यामुळे भारताबाहेर जाण्यापेक्षा भारतातच किती तरी सुंदर, निसर्गसौंदर्यांनी नटलेले असे ठिकाण लोक निवडतात. भारतातील दक्षिण भारत ज्याला देवांची भूमी म्हटले जाते. या ठिकाणी जर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगतो, जेणेकरून तुम्हाला ठिकाण निवडणे सोप्पे जाईल, जाणून घ्या...


 


 


उन्हाळ्यात उत्तर भारताऐवजी दक्षिण भारताला भेट देऊ शकतो का?


भारतातील विविध ठिकाणी उन्हाळ्यात वेगवेगळे हवामान असते. काही ठिकाणी तापमान दमट असते तर काही ठिकाणी तापमान कमी असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात जाण्याचा विचार करत असाल, तर तिथल्या हवामानाची माहिती आधीच माहिती करणे आवश्यक असते. खरं तर, उन्हाळ्यात, लोकांना थंड ठिकाणांच्या शोधात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये फिरणे आवडते. पण आपण उन्हाळ्यात उत्तर भारताऐवजी दक्षिण भारताला भेट देऊ शकतो का? तर याचे उत्तर हो आहे. दक्षिण भारताला भेट देण्यासाठी उन्हाळा हा उत्तम काळ आहे. मे आणि जून महिन्यात दक्षिण भारतातील हवामान सामान्यत: खूप उष्ण आणि कोरडे असते, परंतु या वेळी अनेक ठिकाणी पाऊस आणि आल्हाददायक हवामान देखील असते. उन्हाळ्यात तुम्ही दक्षिण भारतातील या ठिकाणांना भेट देऊ शकता.




कुन्नूर, तामिळनाडू


दक्षिण भारतात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे कुन्नूर, निलगिरी पर्वतांमध्ये हिरवाईने वसलेले हे ठिकाण. स्वर्गाप्रमाणे भासणाऱ्या ठिकाणी कपल्स रोमँटिक सहलीला जाऊ शकतात. उन्हाळ्यात कुन्नूरचे हवामान आल्हाददायक असते आणि थंड वाऱ्याची झुळूक येते. अनेकांना पर्यटन स्थळांसोबतच ट्रेकिंगसारख्या थरारक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. कोईम्बतूर विमानतळ कुन्नूरच्या जवळ आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मेट्टुपालयम आहे.




वायनाड, केरळ


उन्हाळ्यात तुम्ही केरळमधील वायनाडला भेट देऊ शकता. हे शहर दक्षिण भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वायनाडचे हिरवेगार नंदनवन पश्चिम घाटात वसलेले आहे आणि सुंदर संस्कृती आणि वारसा म्हणून ओळखले जाते.




उटी, तामिळनाडू


मे-जून महिन्यात तुम्ही तामिळनाडूमधील उटीला भेट देऊ शकता. हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. निलगिरीच्या मधोमध वसलेल्या, उटीमध्ये नयनरम्य डोंगराळ पायवाटा, बागा, चहाचे मळे आणि तलाव आहेत, ज्यामुळे ते दक्षिण भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक बनले आहे जिथे जगभरातून लोक भेट देतात. या ठिकाणांचे शांत आणि आल्हाददायक हवामान कुटुंब, मुले किंवा मित्रांसह भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे.
जाहिरात




मुन्नार, केरळ


जूनमध्ये भेट देण्यासाठी दक्षिण भारतातील उन्हाळी ठिकाणांपैकी मुन्नार हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. खोल दऱ्या, नयनरम्य टेकड्या आणि सुंदर चहाच्या बागा असलेले मुन्नार हे एखाद्या स्वप्नभूमीपेक्षा कमी नाही. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अनामुदी शिखर मुन्नार येथे आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : महाराष्ट्रात लपलेला 'हा' समुद्रकिनारा चक्क गोव्याची अनुभूती देतो! तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले 'हे' ठिकाण तुम्हाला वेड लावेल..