Travel : असं म्हणतात ना.. लग्नाआधी एकटं फिरून घ्या.. जीवाची मुंबई करून घ्या.. कारण जर लग्न झालं, तर तुमचे दोनाचे चार हात होतील, आणि वैवाहिक बंधनात अडकून तुमचा संसार सुरू होईल, म्हणून जर तुम्ही बॅचरल असाल तर भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी जुलैमध्ये खास तुमच्या बजेटमध्ये पॅकेज आणले आहे. थायलंड हे बॅचलरेटच्या सोलो ट्रिपसाठी उत्तम ठिकाण आहे, तुम्ही जुलैमध्ये IRCTC सोबत प्लॅन करू शकता. जाणून घ्या सविस्तर..
इथे नयनरम्य दृश्यांची कमतरता नाही..!
थायलंडला भेट देण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, कारण हे ठिकाण खूप सुंदर आहे. इथे इतकी सुंदर ठिकाणं आहेत की, त्यांना एकाच वेळी भेट देणे शक्य नाही. जर तुम्ही बजेटमध्ये परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर थायलंडचे नियोजन चांगले होईल. IRCTC ने जुलैमध्ये इथे प्रवास करण्याची संधी आणली आहे आणि तीही तुमच्या बजेटमध्ये. कमी बजेटमध्ये थायलंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. या वर्षी तुम्ही परदेशी सहलीचा विचार करत असाल, तर थायलंड हे एक चांगले ठिकाण ठरू शकते. थायलंडमध्ये नेत्रदीपक दृश्यांची कमतरता नाही, हे ठिकाण नाईट लाईफसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक बेटे आहेत जिथे तुम्ही भेट देण्याचा विचार करू शकता, परंतु काही कारणांमुळे तुम्ही तसे करू शकत नसाल तर IRCTC ने तुमच्यासाठी येथे भेट देण्याची एक उत्तम संधी आणली आहे.
पॅकेजचे नाव- Treasures of Thailand ex Mumbai
पॅकेज कालावधी- 4 रात्री आणि 5 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टीनेशन - बँकॉक, पट्टाया
तुम्ही कधी प्रवास करू शकाल - 31 जुलै ते 4 ऑगस्ट
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असं म्हटलंय की जर तुम्हाला थायलंडचे सुंदर नजारे बघायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
या सुविधा उपलब्ध असतील
तुम्हाला दोन्ही बाजूंनी राउंड ट्रिप फ्लाइट तिकिटे मिळतील.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
प्रवासासाठी इतकी रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 61,200 रुपये मोजावे लागतील.
तर दोन ते तीन लोकांना प्रति व्यक्ती 56,900 रुपये द्यावे लागतील.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.
बेडसाठी (2-11 वर्षे) तुम्हाला 52,600 रुपये द्यावे लागतील
बेडशिवाय तुम्हाला 47,200 रुपये द्यावे लागतील.
अशी करा बुकींग
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : Besties सोबत काहीतरी तुफानी करायचंय? भारतातील 'या' ठिकाणी टॉप रिव्हर राफ्टिंग करा, मूड फ्रेश करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )