Travel : जर तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी उन्हाळा तसेच पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करत असाल, तर कुठे लांब जायची गरज नाही, आम्ही तुम्हाला पुण्याच्याच (Pune) आसपासच्या काही उत्तम ठिकाणांबद्दल माहिती सांगत आहोत, जिथे तुम्हाला निवांत क्षण अनुभवता येतील. या ठिकाणांना तुम्ही भेट देण्याचा नक्का विचार करा, तुम्ही ही सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
पुण्याच्या आजूबाजूला अशी निवांत ठिकाणं
महाराष्ट्रातील पुणे शहर हे अनेक अर्थाने खास मानले जाते. या सुंदर शहराला एक अनोखा इतिहास आहे. त्यामुळे येथील सौंदर्य पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून दररोज हजारो लोक येतात. पुण्याच्या आजूबाजूला अशी अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, जिथे केवळ स्थानिक लोकच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकही भेट देण्यासाठी येतात. तुम्हालाही उन्हाळ्यात- पावसाळ्यात तुमच्या जोडीदारासह, कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत पुण्याच्या आसपासची काही सुंदर ठिकाणे पाहायची असतील, तर आम्ही तुम्हाला या लेखात काही निवांत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
माळशेज घाट
समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर असलेला माळशेज घाट.. हे असे ठिकाण आहे की, ज्याचे खरे सौंदर्य इतर कोणत्याही ऋतूत नाही तर पावसाळ्यात पाहायला मिळते. हे सुंदर ठिकाण महाराष्ट्रातील एक अद्भुत हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे. माळशेज घाट हे महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे जिथे पावसाळ्यात दूरदूरवरून पर्यटक भेटीसाठी येतात. माळशेज घाटातील हिरवाई आणि पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणारे पाणी या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालते. पावसाळ्यात माळशेज घाटातील माळशेज धबधबा, आजोबागड किल्ला, पिंपळगाव जोगा धरण आणि कोकणकडा यासारखी उत्तम ठिकाणे पाहिल्यानंतर तुम्ही इतर ठिकाणे विसराल.
अंतर: पुण्यापासून माळशेज घाट सुमारे 3 तासांच्या अंतरावर आहे.
पवना तलाव
पुणे शहराच्या परिसरात असलेले पवना तलाव हे कोणत्याही पर्यटकाला मंत्रमुग्ध करणारे ठिकाण आहे. विशेषतः पावसाळ्यात या तलावाचे सौंदर्य शिखरावर असते. पवना तलाव निसर्गप्रेमी आणि शांती साधकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. पावसाळ्यात बरेच लोक इथे लाँग ड्राईव्हला जातात. पावसाळ्यात अनेक कुटुंबेही येथे सहलीसाठी येतात. विशेषत: कॅम्पिंगची आवड असलेले पर्यटक तलावाच्या काठावर सर्वाधिक पोहोचतात.
अंतर- पुण्यापासून पवना तलावाचे अंतर सुमारे 50 किमी आहे.
कामशेत
कामशेत हे महाराष्ट्रातील अशा ठिकाणांपैकी एक आहे. जिथे उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटक भेट देतात. आजूबाजूचा शांत परिसर आणि सर्वत्र हिरवळ या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालते. कामशेत केवळ सौंदर्यासाठीच नाही तर साहसी उपक्रमांसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक लोक येथे ट्रेकिंगसाठी तसेच पॅराग्लायडिंगसाठी येतात. कामशेतमध्ये तुम्ही शिंदेवाडी टेकड्या, कुंडेश्वर मंदिर आणि भैरी लेणी यासारखी उत्तम ठिकाणे शोधू शकता.
अंतर- पुणे ते कामशेत हे अंतर अंदाजे 48 किमी आहे
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : हनिमूनसाठी मुंबई-पुण्यातच मस्त अन् स्वस्त डेस्टिनेशन्स! 'या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका