Travelलग्नानंतरचा हनिमून...प्लॅन आहे खास.. बजेट आहे कमी.. कुठे जाणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला आजच्या लेखात काही खास माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमचा हनिमून आठवणीत राहील, आणि जोडीदारही खूश होईल.. तुमच्याकडे बजेट कमी असेल तर तुम्ही बाहेर न जाता आपल्याच महाराष्ट्रात फिरू शकता. एकापेक्षा एक डेस्टीनेशन्स आपल्या राज्यात आहेत. अशात जर जवळपास जायचं असेल तर मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी अशी शांत आणि निवांत ठिकाणं आहे  तुम्हाला लपलेल्या ठिकाणांचा शोध घ्यावा लागेल. जोडप्यांना अनेकदा आपल्या जोडीदारासोबत अशा ठिकाणी वेळ घालवायला आवडते जिथे कमी गर्दी असते. एक अशी जागा जिथे सौंदर्यासोबतच तुम्हाला आरामही वाटेल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मुंबई-पुण्याच्या आसपास असलेल्या अशाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला निसर्गाचा सुंदर नजारा पाहायचा असेल आणि रोमँटिक हनिमून ट्रिपला जायचे असेल तर तुम्ही येथे जाऊ शकता. तुम्ही जर 


 




लोणावळा-खंडाळा


हे ठिकाण हनिमूनसाठी मुंबई आणि पुण्याच्या आसपासच्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. सुंदर हिरव्यागार चादरींनी वेढलेले लोणावळा-खंडाळा मधुचंद्रासाठी उत्तम आहे. लोणावळ्यातील कार्ला लेणी, लोहगड किल्ला, बेडसा लेणी आणि भाजा लेणी ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. मुंबईपासून लोणावळा आणि खंडाळा फक्त 2 तासांच्या अंतरावर आहे. पुण्याहूनही तुम्ही येथे फक्त दीड तासात पोहोचू शकता.





माथेरान



माथेरान हे सर्वोत्तम हिल स्टेशन आहे. कमी बजेट असलेले लोकही माथेरानमध्ये हनिमून ट्रिपची योजना आखू शकतात. ट्रेकिंगप्रेमींना हे ठिकाण आवडेल. मुंबई ते माथेरान हे अंतर अंदाजे 86 किमी आहे. साधारण 2 तासात तुम्ही इथे पोहोचाल. पुण्याहून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 3 तास ​​लागू शकतात. जर तुम्ही एका आठवड्यासाठी सहलीचे नियोजन करत असाल तर तुम्ही या सर्व ठिकाणांना भेट देऊ शकता. मुंबई किंवा पुण्यातून आठवडाभर हनिमून ट्रिपची योजना आखणाऱ्या लोकांना हे ठिकाण आवडेल.




खडकवासला


खडकवासला पुण्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्हाला धबधब्याचे सुंदर दृश्यही पाहायला मिळते. हा धबधबा पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच रोमँटिक वाटेल. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत याचा आनंद घेऊ शकता.




लवासा


पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेले लवासा हे मधुचंद्रासाठी एक अद्भुत ठिकाण आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला परदेशात असल्यासारखे वाटेल. लवासा हे इटलीसारखे सुंदर शहर आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल.




अलिबाग


अलिबाग हे एक लहान शहर आहे. हे ठिकाण हनिमूनसाठी खूपच रोमँटिक आहे. अलिबाग हे सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : महाराष्ट्रातील 'ही' सुंदर छुपी ठिकाणं! हिमाचल, उत्तराखंड विसराल; शांत, निवांत, एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही