Travel : एकटा जीव..सदाशिव! भारतात पहिल्यांदाच Solo trip ला जाताय? 'या' ठिकाणांना भेट द्या, वेगळाच अनुभव येईल
Travel : आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर नक्कीच भेट दिली पाहिजे.

Travel : ते म्हणतात ना, आपला एकटा जीव..सदाशिव बरा..! न कोणाची साथ...न कोणाकडून अपेक्षा..न कसली जबाबदारी.. एकटं मनमोकळं, मनमुराद जगायचं.. असे बरेच लोक असतात ज्यांना नात्यात राहणं आवडत नाही, ते त्यांचं जीवन एकट्यात राहणं पसंत करतात. अशी लोक एकटीच फिरायलाही जातात, आणि विविध ठिकाणांचा अनुभव घेतात. एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांना जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करायला आवडते. पण जर तुम्ही पहिल्यांदाच एकटे जात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे.
एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढतोय
आजकाल एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढत आहे. एकट्याचा प्रवास माणसाला कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्वकाही करण्याची हिंमत देतो. जर तुम्हाला कुठेतरी एकटे जायचे असेल, परंतु ही तुम्ही पहिल्यांदाच ट्रीपला जात आहात, तर काळजी करू नका. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जागा निवडा. कारण तुमची पहिली सोलो ट्रिप चांगली झाली नाही, तर तुम्ही कदाचित पुन्हा एकट्याने प्रवास करण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे सुरुवात चांगली आणि आरामदायी असावी. इथे गेल्यावर तुम्हाला एक वेगळीच हिंमत जाणवेल.

वृंदावन - आध्यात्मिक प्रवासाचा आनंद घ्या
वृंदावन हे श्रीकृष्णाचे शहर म्हणून ओळखले जाते. ज्यांना आध्यात्मिक प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. भगवान कृष्णाच्या या शहरात राधा आणि कृष्ण, मीराबाई आणि बलराम यांना समर्पित अनेक मंदिरं आहेत. म्हणून, जर तुमची देवावर श्रद्धा असेल, तर येथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी देव दिसेल. येथे तुम्ही सेवाकुंज, श्रीजी मंदिर, जुगल किशोर मंदिर, कुसुमा सरो, इमली ताल, कालिया घाट, चिरा घाट, वराह घाट आणि स्वामी हरिदास समाधी या ठिकाणांना भेट देऊ शकता. हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
गोवा - जगण्याची खरी मजा येईल
एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही गोवा हे उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला काही मजेदार आणि थोडं Chill करायचं असेल, जिथे जगण्याची खरी मजा आहे, तर गोवा तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असेल. इथे गेल्यावर अनेक जण मस्तीत मग्न झाल्यासारखे वाटेल. समुद्रकिना-यापासून ते प्राचीन किल्ल्यांपर्यंत सर्व गोष्टींचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
दार्जिलिंग आणि कन्याकुमारी - निसर्गाचे अनोखे नजारे पाहा
जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचे असेल, जिथे तुम्हाला निसर्गाचे अनोखे नजारे पाहता येतील, तर ही दोन्ही ठिकाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन बजेट प्रेमींबरोबरच निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. कोलकात्यापासून ते 625 किमी अंतरावर आहे.
हेही वाचा>>>
Travel : जम्मू काश्मीरचे एक रहस्यमयी मंदिर! जिथून परतणाऱ्या भाविकांवर झालेला दहशतवादी हल्ला, मंदिराची खासियत जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
