Travel : रिमझिम पाऊस, जिथ पाहाल तिथे हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि डोळ्यांना सुखावणारे निसर्गसौंदर्य, तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रातील या निसर्गरम्य ठिकाणाची ब्रिटीश काळात इंग्रजांनाही भुरळ पडली होती. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन एकदा तरी तुम्ही या ठिकाणी भेट द्यायली हवी, आता मान्सून सुरू झाला आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर हिल स्टेशनला तुम्ही भेट द्याल, तर सर्व टेन्शन विसराल आणि निसर्गाच्या सानिध्यात मंत्रमुग्ध व्हाल... जाणून घ्या..
पाच डोंगराच्या समूहावर वसलेलं हे निसर्गरम्य ठिकाण!
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत, ते ठिकाण म्हणजे पाचगणी.. पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या 18-20 कि. मी. अंतरावर आहे. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. असे मानले जाते की, पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे. पाचगणी शहराला वेढलेल्या पाच टेकड्या - दांडेघर, मंदारदेव आणि गोडवाली, खिंगर आणि आमराळ या टेकड्या असल्याचे म्हटले जाते.
ब्रिटिश अधिकाऱ्यांची उन्हाळी राजधानी!
पाचगणीला ब्रिटिश वसाहत काळापासूनचा समृद्ध इतिहास आहे. 1960 च्या दशकात ब्रिटीशांनी या शहराचा शोध लावला होता आणि हे ठिकाण ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी उन्हाळी राजधानी म्हणून समजले जात होते. असं म्हणतात की, इंग्रज इथे सुट्टी घालवण्यासाठी येत असत. पाचगणी एक उत्तम हिल स्टेशन असण्यासोबतच इथली वास्तुकलाही पाहण्यासारखी आहे.
समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची झलक
पाचगणी हे भारतातील महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. हे रमणीय ठिकाण हिरवाईने नटलेले असून हिरव्यागार टेकड्या, खोल दऱ्या आणि खळखळणारे धबधबे, यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आदर्श आहे. हे शहर त्याच्या आल्हाददायक हवामानासाठी आणि सुखदायक वातावरणासाठी देखील ओळखले जाते, येथे पर्यटक हायकिंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या विविध अॅक्टीव्हिटीत सहभागी होतात. या शहरामध्ये अनेक ब्रिटीशकालीन इमारती आणि प्राचीन मंदिरं देखील आहेत, जी या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची झलक देतात.
पाचगणीत पाहण्यासारखी ठिकाणं
टेबल लँड- हे पाचगणी शहरातील सर्वात उंच पठार असून पर्यटकांचे आकर्षणाचे प्रमुख ठिकाण आहे. येथे तुम्ही नैसर्गिक निर्मिती पाहून त्याचे कौतुक करू शकता.
सिडनी पॉइंट - पाचगणीमधील आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे पाचगणीपासून 3 किमी अंतरावर आहे आणि कृष्णा खोरे, कृष्णा नदी, कमलगड किल्ला आणि वाई शहराचे दर्शन घेताना श्वास घेतो.
कमलगड किल्ला- हा खडकांनी वेढलेला एक रहस्यमय किल्ला आहे, या किल्ल्याशी अनेक कथा प्रचलित आहेत.
पंचगंगा मंदिर- हे पाचगणीचे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच एक प्रमुख पर्यटन आकर्षण, अनेक पर्यटक विशेषत: या मंदिराला भेट देण्यासाठी पाचगणीला येतात.
प्रतापगड किल्ला- पाचगणीपासून 40 किमी अंतरावर आहे. हा किल्ला मराठ्यांनी छत्रपती शिवरायांनी बांधल्याची आठवण आहे.
वेण्णा तलाव- हा तलाव पाचगणीपासून 20 किमी अंतरावर आहे. ज्याला बोटींग किंवा मासेमारी करायची असेल त्यांनी हा तलाव चुकवू नये.
पाचगणीला कधी आणि कसे जायचे?
पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाचगणीला भेट देण्याची उत्तम वेळ आहे. जर तुम्ही सप्टेंबर ते मे महिन्याच्या सुरूवातीस पाचगणीला भेट देण्याचा विचार केलात तर तुम्हाला निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येथे खूप थंडी असते. जर तुम्ही थंड वातावरणाचा आनंद घेत असाल तर डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येथे जाऊ शकता. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाचगणीला भेट देण्याची उत्तम वेळ आहे. जर तुम्ही सप्टेंबर ते मे महिन्याच्या सुरूवातीस पाचगणीला भेट देण्याचा विचार केलात तर तुम्हाला खूप राहण्यासाठी पाचगणीमध्ये राहण्यासाठी अनेक मध्यम बजेट ते डिलक्स हॉटेल पर्याय उपलब्ध आहेत.
कसे पोहोचायचे?
पाचगणीला येण्यासाठी मुंबई वरून तीन मार्ग आहेत. महड महाबळेश्वर मार्गे, व पुणे वाई मार्गे आणि पुणे वरून उडतरें गावातून सरळ कुडाळ पाचगणी हा रस्ता आहे
विमान प्रवास
विमानाने प्रवास करायचा असेल तर पुण्याचे लोहगाव विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे. पुण्याहून रस्त्याने पाचगणीला जाता येते.
रस्ता मार्गे
पाचगणीला जाण्यासाठी पुणे, मुंबई, महाबळेश्वर आणि सातारा येथून राज्य बसेस जातात. इथला रस्ता चांगला आहे आणि गाडीनेही इथं जाता येतं.
रेल्वे मार्गे
पाचगणीसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा असले तरी, येथे जाण्यासाठी लोक पुणे स्टेशनवरून येण्यास प्राधान्य देतात, कारण पुण्याचा देशातील इतर शहरांशी चांगला संपर्क आहे.
हेही वाचा>>>
Travel : 'दोनाचे चार हात होण्यापूर्वी फिरून घ्या!' Bachelor सोलो ट्रिपसाठी भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज, टेन्शन विसराल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )