Nana Patole : लोकसभेच्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कन्येने प्रतिक्रिया दिली आहे. "इंडिया आघाडीचा काल पराभव झाला असला तरी तो एकप्रकारे विजयच आहे. पुढे पण काँग्रेस पक्ष चांगले काम करणार आहे. आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे की, बाबा याच वर्षी मुख्यमंत्री होतील", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांच्या कन्येने व्यक्त केली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत येणार असल्याची चिन्हे आहेत. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने 17 जागा लढवल्या होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर शड्डू ठोकला होता. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 21 जागा लढवल्या होत्या. दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादीने सध्या 8 जागांवर आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
इतर महत्वाच्या बातम्या