Travel : मे महिन्यात गरमीमुळे आधीच जीव मेटाकुटीस आला होता, अशात उष्णतेच्या लाटेपासून आता कुठे सुटका होत चाललीय, कारण अवकाळी पावसाचे आगमन राज्यात ठिकाठिकाणी होताना दिसत आहे. मान्सूनही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. जून-जुलैमध्ये पडणारा पाऊस मनाला शांती आणि सुखद गारवा देणारा असतो. वातावरण अगदी रोमॅंटीक होऊन जाते. अशात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एखादी खास ट्रीप प्लॅन करायची असेल, तर भारतीय रेल्वे खास जोडप्यांसाठी मान्सून एन्जॉय करण्यासाठी खास संधी देत आहे. IRCTC ने नवीन पॅकेज लॉंच केले आहे. जे खास कपल्ससाठी आहे, जाणून घ्या सविस्तर...



भारतीय रेल्वेचे जोडप्यांसाठी जुलै ते सप्टेंबर खास टूर पॅकेज 


भारतीय रेल्वेने जोडप्यांसाठी खास टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही जुलै ते सप्टेंबर दरम्यान कधीही प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता. तुम्हाला पॅकेजमध्ये प्रवासाशी संबंधित सर्व सुविधा दिल्या जातील. पॅकेज फीमध्ये जोडप्याच्या राउंड ट्रिप तिकिटांचा खर्च, जेवण आणि हॉटेलचा खर्च देखील समाविष्ट असेल. भारतीय रेल्वे पॅकेजसह प्रवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डेस्टीनेशनवर पोहोचल्यानंतर तुम्हाला स्वतंत्रपणे कॅब बुक करावी लागणार नाही. कारण या पॅकेजसह प्रवास करणाऱ्यांना प्रवासासाठी बस आणि कॅबचीही सुविधा मिळते. ज्याद्वारे तुम्हाला प्रसिद्ध ठिकाणी फिरवण्यात येते.


 




सिक्कीम टूर पॅकेज


भारतीय रेल्वेच्या या पॅकेजचे नाव सिक्कीम सिल्व्हर आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला दार्जिलिंग (2 रात्री) - कालिम्पाँग (1 रात्र) आणि गंगटोक (2 रात्री) भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
दार्जिलिंगमधील सुमी क्वीन्स यार्ड हॉटेलमध्ये राहण्याची सोय उपलब्ध असेल.
कालिम्पाँगमध्ये तुम्ही हॉटेल गार्डन रीचमध्ये रात्र घालवाल.
गंगटोकमध्ये तुम्हाला हॉटेल श्री गो/कुंदन व्हिलेज रिसॉर्टमध्ये राहण्याची संधी मिळेल.


पॅकेज फी


जर तुम्ही ऑगस्टपूर्वी या टूर पॅकेजसाठी तिकीट बुक केले तर तुम्हाला कमी शुल्क भरावे लागेल.
दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 29,600 रुपये आहे.
ऑगस्टनंतर प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 39,300 रुपये मोजावे लागतील.
लक्षात ठेवा की हे पॅकेज शुल्क संपूर्ण 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. हे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तिकीट किंवा हॉटेलसाठी वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही.


फक्त या पॅकेजच्या शुल्कामध्ये तुम्हाला हॉटेल, नाश्ता-डिनर आणि 6 दिवस प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी बसची सुविधा मिळेल.
दुपारच्या जेवणाचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट केलेला नाही.
पॅकेजमध्ये तुम्हाला दार्जिलिंग, कालिम्पाँग आणि गंगटोक या सर्व प्रसिद्ध ठिकाणी नेले जाईल.
कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी प्रवेश शुल्क आवश्यक असल्यास, त्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील.
प्रवेश शुल्क पॅकेजमध्ये समाविष्ट केलेले नाही.


 


हेही वाचा>>>


Hidden Gem Travel : हिरव्यागार जंगलात लपलेला महाराष्ट्रातील 'हा' धबधबा..निसर्गाची एक चित्तथरारक देणगी! जी तुम्हाला वेड लावेल


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )