Travel : बुधवारी रामनवमी (Ram Navmi 2024) असल्याने देशात सध्या भक्तिभावाचं तसेच राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अशात भारतीय रेल्वे (IRCTC) तुम्हाला पुण्य मिळवण्याची संधी देत आहे. भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC ने भाविकांसाठी खास पॅकेज आणले असून यात तुम्ही अयोध्या, काशी, गया, प्रयागराज, पुरी आणि वाराणसीला भेट देण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्ही चांगले टूर पॅकेज शोधत असाल तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या पॅकेजमधून जाऊ शकता. या पॅकेजेसमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय पॅकेजमध्ये तुम्हाला फिरण्यासाठी बस आणि कॅबची सुविधाही दिली जाईल. या पॅकेजेसद्वारे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करू शकता, कारण मुलांचीही विशेष काळजी घेतली जाते.


 




अयोध्या-काशी टूर पॅकेज


या पॅकेजद्वारे तुम्हाला अयोध्या तसेच गया, प्रयागराज, पुरी आणि वाराणसीला भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज 9 रात्री आणि 10 दिवसांसाठी आहे.
हे पॅकेज 6 मे पासून सुरू होणार आहे.
10 दिवसात तुम्ही या सर्व ठिकाणच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकाल.
 या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील प्रसिद्ध मंदिरांना एकत्र भेट देण्याची संधी मिळेल.
पश्चिम रेल्वेने देऊ केलेल्या पॅकेज फीमध्ये रेल्वे तिकीट, हॉटेलचा खर्च, जेवणाचा खर्च आणि सहलीच्या बस सुविधांचा समावेश आहे..


पॅकेज फी


या पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकाल.
स्लीपर कोचमध्ये 2 लोक किंवा 3 लोक एकत्र प्रवास करणाऱ्यांसाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 16,900 रुपये आहे.
जर तुम्हाला स्टँडर्ड क्लासमध्ये तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 26,860 रुपये मोजावे लागतील.
आराम पॅकेजसह प्रवास करणाऱ्यांना प्रति व्यक्ती 35,210 रुपये मोजावे लागतील.
या पॅकेजद्वारे तुम्ही भारतातील सर्वात खास श्री राम मंदिर पाहू शकाल.


अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेची www.irctctourism.com ही वेबसाईट फॉलो करू शकता




काशी ट्रिप


स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्यांना हॉटेलमध्ये एसीची सुविधा मिळणार नाही.
जर तुम्ही स्टँडर्ड क्लासमध्ये तिकीट बुक केले तर तुम्हाला 3 एसी कोचमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल आणि हॉटेलमध्येही एसीची सुविधा दिली जाईल. पण तुम्हाला प्रवासासाठी एसी बस किंवा कॅबची सुविधा मिळणार नाही.
आरामदायी पॅकेजसह प्रवास करणाऱ्यांना 2AC कोच, हॉटेलमधील AC आणि प्रेक्षणीय स्थळांसाठी एसी बस आणि कॅबमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळेल.
पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travel : रामनवमीला गर्दीमुळे अयोध्येला जाता येत नसेल, तर 'या' अद्भूत श्रीराम मंदिरांना भेट द्या, कमी बजेटमध्ये करा यात्रा