Travel : भारतात देवी-देवतांची अशी काही मंदिरं आहेत, ज्यांच्या बद्दल विविध कथा, गोष्टी आणि आख्यायिका प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला 52 शक्तीपीठांपैकी एक भारतातील अशा शक्तिपीठाबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल असे म्हटले जाते की, या ठिकाणी भगवान शंकराची पहिली पत्नी देवी सतीच्या स्तनाचा तुकडा पडला होता, काय आहे यामागील आख्यायिका? या मंदिराचा काय इतिहास आहे? इथे कसे पोहचाल? सर्वकाही जाणून घ्या..



भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले..


देशभरात मातेची अनेक शक्तिपीठे आहेत, त्यापैकी भारतातील बिहारचे हे मंदिर सर्वात खास मानले जाते. या मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सव असो वा नसो, मंदिरात दररोज भाविकांची गर्दी पाहायला मिळते. असे मानले जाते की, जेव्हा भगवान भोले शंकर आपली पत्नी सतीच्या जळलेल्या शरीरासह तिन्ही लोकांमध्ये फिरत होते, तेव्हा भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते. त्यामुळे पृथ्वीवर जिथे जिथे मातेचे शरीर पडले तिथे ते मातेचे शक्तीपीठ झाले. आजच्या लेखात या मातेच्या मंदिराविषयी विशेष माहितीसह आम्ही तुम्हाला येथे दर्शनासाठी कसे येऊ शकता हे देखील सांगणार आहोत.


 


देवी भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाही.. भाविकांची धारणा


बिहारचे हे मंदिर 52 शक्तीपीठांपैकी एक आहे,  येथे दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची श्रद्धा आहे की, देवी मंगला येथे पूजा करणाऱ्या कोणत्याही भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाही. मातेचे चमत्कार पाहून या मंदिराचे नाव माँ मंगला पडल्याचे लोक सांगतात. बिहारच्या गया जिल्ह्यात शक्तीपीठाच्या रूपात देवी मंगळागौरीचे मंदिर आहे. जेथे देवी सतीच्या स्तनाचा तुकडा पडला होता. देवी मंगळागौरी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते असा समज आहे.


 






 



देवीचे हे मंदिर सर्वात खास का आहे?


52 शक्तीपीठांपैकी एक असलेले हे मातेचे मंदिर देवी मंगळागौरी मंदिराच्या नावानेही ओळखले जाते. येथे देवीचे स्तन पडले होते असे मानले जाते. म्हणून या मंदिराला 'पालनहार पीठ' किंवा 'पालनपीठ' असे म्हणतात.
मातेची मूर्ती भव्य कोरीव काम करून तयार करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात भगवान शिव आणि महिषासुराच्या मूर्तींचीही पूजा केली जाते.
तुम्हाला मंदिरात उपा शक्तीपीठ देखील पाहायला मिळेल, ते भगवान शिवाच्या शरीराचा एक भाग मानले जाते.
हे शक्तिपीठ आसाममधील कामरूप येथे असलेल्या मां कामाख्या देवी शक्तीपीठासारखेच मानले जाते.



पालनहार पीठ पर्यंत कसे पोहचाल?


बिहारच्या गया शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर भस्म कुट पर्वतावर आहे. हे बिहारमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.


रस्त्याने-  तुम्ही येथे खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीने दर्शनासाठी येऊ शकता.


रेल्वेने - मंगला गौरी मंदिरासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गया रेल्वे स्टेशन आहे. गया येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा बसने प्रवास करू शकता. 


हवाई मार्गे - सर्वात जवळचा विमानतळ गया विमानतळ आहे. विमानतळावरून, तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी किंवा बसने प्रवास करू शकता.


 


हेही वाचा>>>


Travel : Besties सोबत काहीतरी तुफानी करायचंय? भारतातील 'या' ठिकाणी टॉप रिव्हर राफ्टिंग करा, मूड फ्रेश करा..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )