Dry Fruits Modak Recipe : गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सजावाटीपासून प्रसादापर्यंत अनेक गोष्टींच्या तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सवात दररोज काय वेगळा प्रसाद करायचा असा प्रश्न गृहिणींना पडलाय. बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही मोदकांचा विचार करत असाल तर काहीही न तळता आणि उकडता तुम्ही गणपती बाप्पासाठी खास सुकामेवा आणि खजूराचे मोदक बनवू शकता. कुणाच्या घरी दर्शनाला जातानाही तुम्ही हे आरोग्यासाठी फायदेशीर असणारे मोदक घेऊन जाऊ शकता. 


मोदकासाठी लागणारे साहित्य



  • बदाम - 7 ते 8

  • काजू - 5 ते 6

  • मनुका - 7 ते 8

  • अक्रोड - 3 ते 4

  • पिस्ते - 4 ते 5

  • मऊसर खजूर एक कप

  • पाव कप तूप


मोदकाची कृती


- बाजारातून खास मऊसर खजूर विकत घ्यावेत. 
- खजूराच्या बिया काढून ते हातानेच दाबून घ्यावे. 
- बदाम, काजू, मनुका, अक्रोड, पिस्ते या सुकामेव्याचे बारीक काप करावेत. 
- काप करणं शक्य नसेल तर मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. 
- सुकामेव्याचे बारीक काप केल्यानंतर त्यात खजूर घालावे. 
- सुकामेव्याचे बारीक काप आणि खजूरा तूप टाकून ते मिश्रण हाताने चांगलं मळून घ्या. 
- तयार झालेलं सारण हातावर घेऊन त्याला मोदकासारखा आकार द्या किंवा मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवा. 


बाप्पाचं आगमन यंदा कधी होणार?
 
यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे.


संबंधित बातम्या


Ganesh Chaturthi Recipes : गणपतीला दाखवा खास पण वेगळे नैवेद्य, मखान्यापासून मोदक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत


Ganesh Chaturthi 2022 Chocolate Modak : बाप्पाचं स्वागत करा चॉकलेट मोदकाने; जाणून घ्या कृती...