Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चौथ्या सीझनचे दोन प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे हा सीझन कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 25 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 25 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 24 सप्टेंबरला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडू शकतो. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठीच्या चौथा सीझनला सुरुवात होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन महेश मांजरेकर करणार होस्ट
बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षक बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘या’ कलाकारांना विचारणा झाल्याची चर्चा!
‘बिग बॉस मराठी 4’साठी काही कलाकारांना विचारणा झाल्याची देखील चर्चा सुरू आहे. या कलाकारांमध्ये अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर यांची नावे सामील आहेत. मात्र, वाहिनीकडून अद्याप यावर कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.
संबंधित बातम्या