मुंबई : या देशातील केंद्र सरकार हे कंगाल आणि दारुड्या सारखे सरकार आहे. तर RSS हे देशातील आतंकवादी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली.  मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद निकालावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या निकालाने समाधानी आहे. लोकांची कामं केली म्हणून आम्हाला अकोल्यात सत्ता दिली. तसेच काही जिल्हा परिषदांमध्ये आमचे सदस्य निवडून आले आहेत.


या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्राचे सरकार हे कंगाल आणि दारुडे सरकार अशी अवस्था आहे. सरकारी तिजोरी खाली झाली आहे. ही गोष्ट सरकार लपवत आहे. शासन चालविण्यासाठी 13 लाख कोटी सरासरी लागतील असा अंदाज आहे. नवीन बजेट येईपर्यंत उरलेली रक्कम जमेल का अशी शंका आहे. शासन चालविण्यासाठी पैसे कुठून येणार ? असा सवाल त्यांनी केला आहे. 12 लाख कोटींची तूट केंद्र सरकारला पडणार आहे. दारूडा जसा घरातील वस्तू विकतो, तसं हे सरकार मालमत्ता विकत आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच विकण्याचा डाव आहे. असही आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा- Special Report | नागरिकत्व दुरुस्ती कायदा 40 टक्के हिंदुच्या विरोधात? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यात किती

अमेरिका - इराण युद्ध सुरू झाले तर त्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोटबंदी दरम्यान एनआरआय लोकांना शासनाने पैसे डिपॉझिट करण्यात सूट दिली होती, याद्वारे किती पैसे आले याची माहिती सरकारने द्यावी. देशाची आर्थिक स्थिती लपविण्यासाठी CAA, NRC मुद्दे भाजप कडून पुढे केले जात आहेत, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी-काँग्रेस हे शेतात जे पिकतं त्याच्या नव्हे तर त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरील प्रेमी आहे, असे आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, JNU प्रकरणात भाजपची वृत्ती दिसून येते, हे सगळं त्यांच्याकडून घडवलं जात आहे. ते याला शहरी आतंकवादी असे म्हणतात, मात्र या देशातील खरा आतंकवादी हा RSS आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या

'वंचित'ला भाजपची बी टीम म्हणणारे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची बी टीम म्हणणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल 

CAA आणि NRC चा फटका हिंदूंना अधिक, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट 

Prakash Ambedkar | भाजपकडून देशाची आर्थिक स्थिती लपवली जाते : प्रकाश आंबेडकर | ABP Majha

Vanchit Bahujan Aghadi against CAA | सीएए, एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांचं धरणं | ABP