Reverse Walking Benefits : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मॉर्निंग वॉक आणि जॉगिंग खूप महत्वाचे मानले गेले आहे. बरेच लोक स्वतःला सक्रिय आणि निरोगी ठेवण्यासाठी चालण्याला महत्त्व देतात. तुम्ही देखील चालणे आणि जॉगिंगशी संबंधित अनेक आरोग्यदायी फायद्यांबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला 'रिव्हर्स वॉकिंग' माहित आहे का? तुम्ही कधी त्याबद्दल ऐकले आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला या खास चालण्याच्या अनेक जबरदस्त फायद्यांबद्दल सांगणार आहोत आणि हेही सांगणार आहोत की 'रिव्हर्स वॉकिंग' तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कसे काम करू शकते.


'रिव्हर्स वॉकिंग' म्हणजे काय?


'रिव्हर्स वॉकिंग' म्हणजे उलटे चालणे म्हणजेच तुमची पावले पुढे जाण्याऐवजी मागे टाकणे. पुढे चालण्यापेक्षा 'रिव्हर्स वॉकिंग' खूप चांगले आहे. मधुमेह, रक्तदाब किंवा किडनीच्या समस्या यांसारख्या अनेक आजारांवर मात करण्यास हे तुम्हाला मदत करू शकते.


Reverse Walking चे फायदे


हेल्थलाईनच्या अहवालानुसार, 'रिव्हर्स वॉकिंग'चे अनेक फायदे आहेत. हे तुमचे शारीरिक आरोग्य तर चांगले ठेवतेच पण मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्ही दररोज सकाळी 10-20 मिनिटे रिव्हर्स वॉकिंग करावे. हा एक प्रकारचा कार्डिओ वर्कआउट आहे, जो तुमचे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतो. तसेच तुमचे स्नायू मजबूत होतात. 
गुडघ्यांमध्ये वेदना आणि क्रॅम्पच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रिव्हर्स वॉकिंगचीही मदत घेऊ शकता. सांधेदुखीच्या रुग्णांसाठीही हा वॉक खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना वारंवार पाठदुखीचा त्रास होतो, अशा लोकांनी सकाळी 10-15 पर्यंत रोज रिव्हर्स वॉकिंग करावे. 


Reverse Walking चे तोटे


1. पडण्याचा धोका : 'रिव्हर्स वॉकिंग' आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण त्यात पडण्याची किंवा तोल जाण्याची शक्यता जास्त असते. रिव्हर्स वॉकिंग करताना खूप काळजी घेण्याची गरज आहे. 


2. पाहण्यात अडचण : 'रिव्हर्स वॉकिंग' म्हणजे मागे चालणे. यामुळे एखाद्या गोष्टीला आदळण्याचा किंवा पडण्याचा धोका जास्त असतो. कारण पुढे चालताना तुम्ही तुमच्या पावलांवर जेवढे लक्ष ठेवू शकता, तेवढे तुम्ही उलट चालताना ठेवू शकत नाही.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर