Artificial Uterus Facility : काय म्हणता..आता 'मशीन' देणार मुलांना जन्म? काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर
Artificial Uterus Facility : टेक्नॉलॉजीद्वारे ज्या दाम्पत्यांना मशीनद्वारे मुलाला जन्म द्यायचा आहे ते या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात.
Artificial Uterus Facility : असं म्हणतात की आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने बाळाला आपल्या गर्भात वाढवणं आणि त्या बाळाला जन्म देणं हे मातृसुख फक्त एक आईची अनुभवू शकते. मात्र, आता मुलांनासुद्धा तुम्ही मशीनद्वारे जन्माला घालू शकता असे सांगितले तर? आश्चर्याचा धक्का बसला ना? जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) ज्या पद्धतीने फेसबुक, ऍपल, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, गुगल यांच्यासह जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काम करत आहेत. त्यातच अशी बातमी समोर आली आहे की, भविष्यात ज्या महिलांना गर्भात मूल वाढवायचे नाहीये पण आई व्हायचे आहे अशा महिला मशीनद्वारे बाळाला जन्म देऊ शकणार आहेत. 'आर्टिफिशियल गर्भाशय फॅसिलिटी' (Artificial Uterus Facility) असं या टेक्नॉलॉजीचं नाव आहे. या टेक्नॉलॉजीद्वारे ज्या दाम्पत्यांना मशीनद्वारे मुलाला जन्म द्यायचा आहे ते या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. ही खरंच जगासाठी धक्कादायक बातमी आहे. या टेक्लॉलॉजीद्वारे बाळाचे संगोपन कृत्रिम गर्भाशयात केले जाईल आणि भ्रूणापासून जन्मापर्यंत संपूर्ण काळजी मशीनद्वारे घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे.
मुले कशी जन्माला येतील?
अॅक्टोलाइफ नावाच्या कंपनीने कृत्रिम गर्भातून मूल जन्माला घालण्याचा दावा केला आहे. कंपनीने एक व्हिडीओ शेअर करून सांगितले आहे की, आता टेक्नॉलॉजीचा वापर करून मूल जन्माला घालणे शक्य होणार आहे. जर एखाद्या स्त्रीला गर्भाशय नसेल किंवा काही गंभीर आजारामुळे तिचे गर्भाशय काढून टाकावे लागले असेल ती ती स्त्री आता ती आई होऊ शकते. त्याचप्रमाणे पुरुषाला वंध्यत्वाची समस्या असेल आणि स्त्री आई होऊ शकत नसेल तर ही टेक्नॉलॉजी वापरता येईल. या तंत्रज्ञानाचे पूर्ण नाव कृत्रिम गर्भाशय सुविधा (Artificial Uterus Facility) आहे. हे जगातील पहिल्या कृत्रिम गर्भाप्रमाणे काम करेल असा अॅक्टोलाइफ कंपनीचा दावा आहे.
मुलांचा संसर्ग मुक्त जन्म होऊ शकतो
कंपनीचा असा दावा आहे की, या टेक्नॉलॉजीद्वारे मूल संसर्गमुक्त जन्माला येते. अॅक्टोलाइफकडे उच्च सेवासुविधांसह 75 प्रयोगशाळा आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेत 400 ग्रोथ पॉड्स आहेत. जिथे गर्भाशयाप्रमाणे बाळाची वाढ होते. प्रत्येक पॉडची रचना अगदी आईच्या गर्भातील गर्भाशयासारखी असते. यांना कृत्रिम गर्भाशय म्हटले जाते कारण ते मुलांना आईच्या गर्भाचा अनुभव देते.
ग्रोथ पॉड्स म्हणजे काय?
ग्रोथ पॉड्स हे टेक्नॉलॉजीला जोडलेले ब्रूडर आहे. यामध्ये बाळाची त्वचा, नाडी, तापमान, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, श्वासोच्छवासाची गती, हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आणि शरीराचे इतर अवयव बाळाच्या वाढीमधील या लक्षणांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रोथ पॉडमध्ये सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे तुम्ही मुलाशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. याशिवाय, पालकांना मुलांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी एक अॅप तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये मुलाच्या वाढीशी संबंधित सर्व हालचाल ते थेट पाहू शकतात.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :