Teachers Day 2024 Gift Ideas: शिक्षकांना द्यायचंय गिफ्ट, पण बजेट कमी? आपल्या हाताने 'या' खास वस्तू बनवून गिफ्ट द्या, शिक्षक करतील कौतुक
Teachers Day 2024 DIY Gift Ideas: तुम्हालाही शिक्षक दिनानिमित्त तुमच्या शिक्षकांनाला भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही स्वत: एक DIY गिफ्ट बनवून देऊ शकता.
Teachers Day 2024 Gift Ideas : दरवर्षीप्रमाणे 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यात मोलाचे योगदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी हा दिवस आहे, यानिमित्त शाळा-कॉलेजात शिकणारे विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देतात, पण अनेकदा मुलांना त्यांच्या पालकांकडून तेवढे पैसे मिळत नाहीत, त्यामुळे त्यांची निराशा होते. जर तुमच्या बाबतीतही असेच होत असेल आणि तुम्हाला तुमच्या घरातून पैसे मिळत नसतील, तर तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करून तुमच्या शिक्षिकेसाठी एक उत्तम भेट देऊ शकता. अशा भेटवस्तू पाहून तुमच्या शिक्षकांनाही खूप आनंद होईल. तसेच, तुमच्या कलेचे देखील कौतुक केले जाईल.
घरी असलेल्या काही वस्तूंमधून बनवा सुंदर गिफ्ट!
आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी असलेल्या काही वस्तूंमधून एक सुंदर आणि हृदयस्पर्शी भेट बनवू शकता. या भेटवस्तू केवळ तुमच्या शिक्षकालाच आनंदित करणार नाहीत, तर त्यांच्यावर तुमचे प्रेम देखील दर्शवतील.
शिक्षकांना देण्यासाठी 'या' भेटवस्तू घरी तयार करा..
ग्रीटिंग कार्ड्स
ग्रीटिंग कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला रंगीत कागद, गम, कात्री, पेन्सिल, पेंट, रिबीन किंवा धागा लागेल. रंगीत कागद दुमडून कार्ड बनवा. कार्डवर तुमच्या शिक्षकासाठी सुंदर संदेश लिहा. त्यानंतर, हे ग्रीटिंग कार्ड रंगीबेरंगी चित्रे, स्टिकर्स किंवा बॅबल्सने सजवा. शेवटी, रिबन किंवा धाग्याने कार्ड बांधल्याने त्याला एक विशेष लुक मिळेल.
फ्लॉवर पॉट देखील देऊ शकता
घरात सध्या असलेल्या जुन्या बाटल्यांच्या मदतीने तुम्ही फ्लॉवर पॉट बनवून तुमच्या शिक्षकाला देऊ शकता. यासाठी तुम्हाला एक जुनी प्लास्टिकची बाटली घ्यावी लागेल आणि तिचा खालचा भाग अशा प्रकारे कापावा लागेल की, त्यामध्ये झाडे लावता येतील. हा कापलेला भाग रंगीत कागद किंवा कापडाने चिकटवा. त्यावर काही छोटे स्टिकर्सही लावा. तुम्हाला हवे असल्यास मार्करच्या मदतीने तुम्ही त्यावर काही संदेशही लिहू शकता. शेवटी, गुलाब किंवा झेंडूचे रोप लावा आणि शिक्षकांना भेट द्या.
स्वतः तयार करा सुंदर फोटो फ्रेम
कार्डबोर्ड किंवा लाकडाच्या तुकड्यापासून एक लहान फ्रेम बनवून तुम्ही तुमच्या शिक्षकाला भेट देऊ शकता. इच्छित असल्यास, आपण त्या फ्रेममध्ये आपला आणि आपल्या शिक्षकांचा फोटो लावू शकता. त्यावर त्यांच्या सन्मानार्थ काही शब्द लिहू शकता.
हाताने तयार केलेला पेन होल्डर
ऑनलाइन मिळणाऱ्या वस्तूंवरून तुम्ही कार्डबोर्ड वापरून पेन होल्डर बनवू शकता. त्यासाठी आधी पुठ्ठ्याला चौकोनी आकारात कापून बेस तयार करावा लागेल. नंतर चारही बाजूंनी कडा तयार करून गमच्या मदतीने चिकटवा. तुम्हाला हवे असल्यास त्यावर रंगरंगोटी करून किंवा त्यावर रंगीबेरंगी कागद चिकटवून तुम्ही ते अधिक आकर्षक बनवू शकता. त्यावर काही इमोजी स्टिकर्स लावा. तुमचा हाताने तयार केलेला पेन होल्डर तयार होईल.
हेही वाचा>>>
Teachers Day 2024 : शिक्षक दिनाची कल्पना सर्वप्रथम कोणाच्या मनात आली? भारतात 5 सप्टेंबरलाच हा दिन का साजरा होतो? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )