Health Tips: हिवाळ्यात पोटदुखीचा त्रास होतोय? करा हे घरगुती उपाय
Stomach Problems In Winter: थंडीमध्ये अनेकांना सर्दी आणि खोकल्यासोबतच पोटदुखीचा देखील त्रास होतो.
Stomach Problems In Winter: थंडीमध्ये अनेकांना सर्दी आणि खोकल्यासोबतच पोटदुखीचा देखील त्रास होतो. त्यामुळे हिवाळ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात पोटदुखी होत असेल तर अनेक लोक वेगवेगळ्या प्राकरची औषध घेतात. पण तुम्हाला हिवाळ्यात जर पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता.
मेथीचे दाणे आणि गरम पाणी
मेथीला भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये काळे मिठ मिक्स करा. आता मेथीचे दाणे गरम पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी प्या. मेथीच्या दाण्यांमुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. त्यामुळे पोटदुखी कमी होते.
गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकावे
हिवाळ्यामध्ये थंडीने पोटदुखी होते. त्यामुळे गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम पाणी असलेल्या बॉटलने पोट शेकावे.
बेकिंग सोडा आणि गरम पाणी
हिवाळ्यात अपचनामुळे अनेक वेळा पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे बेकिंग सोडा आणि गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. तसेच पोटदुखी देखील कमी होते. एक चमचा बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून प्या.
हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तुम्ही रोज अक्रोड, बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे. यासोबतच फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे अ, क, ब आणि फायबर असलेली फळे आणि भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरातील मेटाबोलिजम सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
Skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )