Soaked Almond Benefits : ड्रायफ्रूट्स खाणं प्रत्येकालाच आवडतं असं नाही. मात्र, हे ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी फार चांगले मानले जातात. यापैकीच बदाम (Almond) हे विशेष ड्राय फ्रूट आहे. कारण बदामात अनेक पोष्क तत्त्वे, विटामिन्सचा समावेश असतो. यामुळे बुद्दीही तल्लख होते. त्यामुळे घरात अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कच्च्या बदामापेक्षा जर भिजवलेले बदाम तुम्ही खाल्ले तर यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे फायदे कोणते ते जाणून घ्या.   


बदाम हे ड्राय फ्रूट आहे आणि बहुतांश ड्राय फ्रुट्स हे गरम असतात. बदामही खूप गरम असतात. म्हणून, ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत जी आरोग्याशी संबंधित आहेत, ज्यामुळे आरोग्य तज्ञ बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सोलून खाण्याचा सल्ला देतात.


बदाम भिजवल्यानंतर खाण्याचे फायदे : 



  • पहिली गोष्ट म्हणजे बदामाच्या तपकिरी त्वचेत, जी त्वचा बदामासारखी चिकटलेली असते, त्यात टॅनिन नावाचे तत्व असते. ज्यामुळे बदामाच्या पचनामध्ये त्रास होतो. 

  • टॅनिनमुळे, बदामाचे सर्व गुणधर्म शरीराला मिळत नाहीत. कारण ते बदामाद्वारे एन्झाईम सोडण्यात अडथळा आणतात. त्यामुळे बदाम खाल्ल्यानंतरही शरीराला त्याचे सर्व गुणधर्म मिळत नाहीत.

  • बदाम पाण्यात भिजवल्याने त्याची त्वचा सोलणे सोपे होते आणि बदाम खाल्ल्याने त्यातील सर्व पोषक तत्वे देखील मिळतात. 

  • भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरात साठलेली चरबीही कमी होण्यास मदत होते. कारण सोललेले बदाम लिपेस नावाचे एन्झाइम सोडते, जे शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते.

  • भिजवलेले बदाम वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. कारण त्यातून बाहेर पडणारे एन्झाइम्स आणि कार्ब्स पोट दीर्घकाळ भरलेले राहतात. अशा स्थितीत तुम्ही अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून वाचता आणि हळूहळू तुम्ही वजन नियंत्रण करू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :