R Madhavan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. माधवननं केलं होतं. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या चित्रपटामध्ये आर. माधवननं इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका देखील साकारली होती. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की, 'रॉकेट्री' मुळे आर. माधवननं त्याचे घरही गमावले. या चर्चेवर आता स्वत: आर. माधवननं प्रतिक्रिया दिली आहे.
आर. माधवनचं ट्वीट:
आर. माधवननं ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'अरे यार, माझा इतका गौरव करू नका. मी माझे घर किंवा काहीही गमावले नाही. सत्य हे आहे की, रॉकेट्री चित्रपटामध्ये ज्यांनी पैसे गुंतवले ते सर्वजण अभिमानाने यावर्षी आयकर भरणार आहेत. देवाच्या कृपेने आम्हाला चांगला नफा मिळाला आहे. मी अजूनही माझ्या घरात प्रेमाने राहतो.' आर. माधवनच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 26 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे .या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 75 लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: