Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेला खूप नुकसान सहन करावे लागते. या काळात कमी काळजी घेतल्यामुळे चेहऱ्यावर अनेक परिणाम दिसू लागतात. त्वचा निस्तेज दिसू लागते. त्वचेचा चमकदारपणा निघून जातो. शहरातील वाढते प्रदूषण, तसेच इतर अनेक गोष्टीही या समस्येला कारणीभूत आहेत. या गोष्टींमुळे तसेच त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काळे डाग, पुरळ इत्यादी समस्या देखील दिसू लागतात. या सर्व समस्या टाळण्यासाठी अनेक लोक बाजारत विकत मिळणारी उत्पादने खरेदी करतात. पण अनेकदा ही महागडी उत्पादने देखील फारशी प्रभावी ठरत नाहीत. अशा वेळी, उगाच पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरी बनवलेले हे दोन प्रकारचे फेस पॅक वापरून पाहू शकता. 


पपई आणि अंड्याचा फेस पॅक


पपईचे अनेक फायदे आहेत. पपईचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. पपई हा फेस पॅक तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी उत्तम आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी, प्रथम एका लहान वाटीत पपईचा रस घ्या. यात आता 2 चमचे दही, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब मिसळा. व्यवस्थित मिसळून काही वेळ हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. फेसपॅक वापरताना त्यात थोडे ग्लिसरीन आणि अंड्याचा पांढरा भाग घाला.


आता हा फेस पॅक चेहऱ्याला लावा आणि 30 मिनिटे तसाच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. पपई चेहऱ्यावरील डागांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. तर, दही तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करू शकते. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता.


मध आणि लिंबाचा फेस पॅक


मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका लहान वाटीत मध आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळा आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे तसेच चेहऱ्यावर सुकू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :