एक्स्प्लोर

Skin Care Tips : हिवाळ्यात फेसवॉश ऐवजी 'या' गोष्टींनी चेहरा धुवा; त्वचेचा ग्लो आणखी वाढेल

Skin Care Tips : मधाच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावरची चमक कायम राहते.

Skin Care Tips : प्रत्येक मुलीला आपली त्वचा पिंपल्सरहित आणि तजेलदार असावी असं वाटतं. यासाठी महिला अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने (Beauty Products) वापरतात. सर्वात आधी, चेहऱ्यावर फेस वॉश (Face Wash) लावतात. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. पण, प्रत्येक वेळी रसायनयुक्त फेस वॉश वापरणं गरजेचं नाही. त्यामुळे अनेक वेळा त्वचेच्या समस्या वाढतात. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी काही घरगुती गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे. या नैसर्गिक गोष्टींनी तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक ग्लो करेल. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

बेसनाचे पीठ

बेसनाच्या डाळीपासून बनवलेले बेसन चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. पूर्वी लोक चेहरा तजेलदार करण्यासाठी चेहऱ्यावर बेसनाचे पीठ लावायचे.  हा बेसनाचा फेस पॅक तयार करण्यासाठी बेसनामध्ये गुलाब पाणी आणि दही मिसळून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण 4-5 मिनिटांनी चेहरा हलक्या हाताने धुवून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसांतच नैसर्गिक ग्लो येईल.

मध

मधाच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावरची चमक कायम राहते. याशिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात, जे त्वचेला आरामदायी प्रभाव देतात. यासाठी सर्वात आधी चेहरा हलका ओला करा. यात थोडे मध घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चोळा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवा.

टोमॅटोचा रस

टोमॅटोमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. टोमॅटोच्या रसाने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि चेहऱ्यावरचे डागही दूर होतात. टोमॅटोचा रस लावण्यासाठी त्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यानंतर, 5-7 मिनिटे चेहरा तसाच ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे चेहरा तजेलदार दिसेल.

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल तर तुम्ही रसायनयुक्त प्रोडक्टचा वापर करण्या व्यतिरिक्त जर या गोष्टींचा चेहऱ्यासाठी वापर केला तर तुम्हाला काही दिवसांतच त्याचा फरक दिसून येईल. तसेच, चेहऱ्यावरचे डागही दूर होतील. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget