Skin Care Tips : मेकअप केल्यानंतर 2 तासांतच चेहरा निस्तेज होतो? 'हे' आहे यामागचं कारण; वाचा मेकअप करण्याची योग्य पद्धत
Skin Care Tips : अनेक स्त्रिया मेकअप करताना काही सामान्य चुका करतात ज्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात.
Skin Care Tips : आजकाल आपल्या सर्वांनाच एक बेसिक मेकअप कसा करावा हे माहीत आहे. पण, हा मेकअप केल्यानंतर काही काळाने चेहरा (Skin Care Tips) डल दिसू लागतो. चेहऱ्यावर घाम येतो. अशी अनेक महिलांची तक्रार असते. यामुळे अनेक स्त्रिया मेकअप करताना संकोच करतात. मात्र, यामागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? खरंतर, अनेक स्त्रिया मेकअप करताना काही सामान्य चुका करतात ज्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. या चुका नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
अशा अनेक चुका टाळण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घ्या.
मेकअप ब्रश आणि ब्लेंडर स्वच्छ न ठेवणे
मेकअप करताना, बहुतेक स्त्रिया लक्ष देत नाहीत की त्यांचे ब्रश आणि ब्लेंडर देखील घाण होऊ शकते. घाणीमुळे मेकअप डल होण्याचा धोका असतो. यासाठी प्रत्येक आठवड्याला मेकअप ब्रश स्वच्छ करा. ब्रश स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो पाण्याने धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ब्रश पाण्यातही ठेवू शकता. तसेच, एकच ब्रश जास्त काळासाठीही वापरू नका.
प्रायमर वापरू नका
चेहर्यावर फाउंडेशन लावण्यापूर्वी प्रायमरचा वापर केला नाही तर तो फायनल लूकला नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे, तुमच्या चेहऱ्याची फिनिशिंग चांगली होणार नाही आणि थेट चेहऱ्यावर फाउंडेशन लावल्याने त्वचेचे नुकसान होते. यामुळे पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे असे करू नका.
अस्वच्छ हातांनी मेकअप करणे
अनेकदा महिला घाईत हात स्वच्छ न धुता मेकअप करतात. अशा वेळी तुमच्या प्रोडक्टमध्ये घाण मिसळल्याने पिंपल्स येण्याचा धोका वाढतो. अशा वेळी मेकअप करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात चांगले धुवावेत जेणेकरून तुमचा मेकअप डल होणार नाही.
लिप शेड जास्त डार्क नको
डार्क लिप शेड कॅरी करायला सोपी आहे पण आजकाल या लिप शेडना फार कमी पसंती मिळते. कारण यामुळे तुमचा लूक डल दिसू शकतो. यासाठी तुम्ही न्यूड किंवा ब्लूमिंग लिप शेड्सची निवड करावी.
मेकअप फिक्सर
मेकअप सेटिंग स्प्रे हा या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण, यामुळे अनेकदा तुमचा लूक खराबही होऊ शकतो. यासाठी सेटिंग स्प्रे शेवटी लावावा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो. तुम्ही तुमच्या मेकअप रुटीनमध्ये याचा समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :