Rice Effects : भात खाणे अनेकांना आवडते. काही लोक त्यांच्या आहारात चपातीऐवजी केवळ भाताचा समावेश करतात. खरंतर चपाती ऐवजी भात बनवणं देखील खूप सोपं आहे. मात्र, काही लोक असेही आहेत, जे भाताला हातही लावत नाहीत. कारण, भात खाल्ल्याने त्यांचे वजन वाढते. ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळ, राजमा, छोलेसोबत भात खाणे बहुतेकांना आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की, जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते. चला जाणून घेऊया भात खाण्याचे दुष्परिणाम...


पोट फुगण्याची समस्या


भात खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि पोट फुगण्याची समस्याही दिसू लागते. भात खाल्ल्यानंतर लगेच झोपणे योग्य नाही. मात्र, भाताचे वैशिष्ट्य म्हणजे तो लवकर पचते. यामुळे तुम्हाला पुन्हा भूक लागायला लागते आणि तुम्ही दिवसभर काही ना काही खात राहता. यामुळे तुमचे वजन वाढू शकते.


साखरेची पातळी वाढते


भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन अजिबात करू नये.


वजन वाढते


शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे दररोज भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात मर्यादित प्रमाणात खावा.


गॅसची समस्या


जर तुम्ही भात खाण्याची शौकीन असाल, तर पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता. हे तांदूळ जास्त आरोग्यदायी आहे. पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त नसते. अशा स्थितीत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. कधीकधी पोट जड आणि फुगलेले देखील दिसते.


शरीरात सुस्तपणा जाणवतो


ऑफिसमध्ये किंवा घरी जेवणाच्या वेळेत पोटभर भात खाल्ल्यास जेवल्यानंतर काही वेळातच झोप येऊ लागते. असे घडते, कारण तांदूळ शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो. भात खाल्ल्याने शरीर सुस्त होऊन आळस वाढतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha