Weather Forecast News : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या उत्तर पश्चिम भागात काही प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी सध्या जोरदार वारे अजूनही वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्ली-एनसीआरमध्ये आकाश निरभ्र होते, तर कमाल तापमान हे 23.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर राजधानीचे किमान तापमान 8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी आहे. दरम्यान आजही दिल्लीत हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रज्यात तपमनात चढ उतार सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तपमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. तर कोकणात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे.
आजपासून महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पहाटे तापमानात घट झाल्याने रज्याच्या काही भागामध्ये गरठा जाणवत आहे. तर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात उन्हाच्या झळा लागत आहेत.
दरम्यान, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस सूर्यप्रकाशाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतू, जोरदार वारे वाहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या राज्यांमध्ये वाऱ्यांचा वेग 25 ते 35 किमी असू शकतो. या राज्यांमध्ये येते काही दिवस धुके राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये आज आकाश ढगाळ राहू शकते तसेच अनेक भागात पाऊसही पडू शकतो.
सततच्या बर्फवृष्टीमुळे हैराण झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ हवामानामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. मात्र, रात्री थंडीचा कहर कायम आहे. , हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान शून्य अंशांच्या खाली जात आहे. श्रीनगर केंद्राच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी राज्यातील काही भागात पाऊस पडू शकतो. मात्र, येत्या काही दिवसांत हवामान जवळपास निरभ्र राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दुसरीकडे, उप-हिमालयी प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: