Health Benefits Of Kiwi : हिवाळ्याआरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. रोज एक किवी (Kiwi) खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी किवीचे सेवन जरूर करा. आज आम्ही तुम्हाला किवीचे फायदे सांगणार आहोत. किवी हे वर्षभर उपलब्ध असणारे फळ आहे. तुम्ही किवी कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. किवी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुमच्यात रोगांशी लढण्याची क्षमता विकसित होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत असली पाहिजे. किवी खायलाही खूप चविष्ट आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात किवीचा समावेश करायला हवा. जाणून घ्या किवीचे फायदे.


किवी खाण्याचे फायदे


1. हृदयरोग, ब्लड प्रेशरची समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही किवी खूप फायदेशीर आहे.
2. किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
3. किवी खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या दूर होतात.
4. पोटातील उष्णता आणि अल्सरसारखे आजार दूर करण्यासाठीही किवी हे अतिशय उपयुक्त फळ आहे.
5. किवीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे गर्भवती महिलांना खूप फायदे मिळतात.
6. किवी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणातही मदत होते. दररोज किवी खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते.
7. किवी सांधेदुखी, हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
8. किवी मानसिक ताण, बॅक्टेरिया आणि व्हायरसचा हल्लाही दूर करते.


किवीमधील पोषकतत्वे
किवीमध्ये भरपूर पोटॅशियम असते. किवीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे फिटनेसची काळजी घेणाऱ्यांना किवी खायला खूप आवडते. किवीमध्ये केळीपेक्षा जास्त पोटॅशियम आणि अर्ध्या कॅलरीज असतात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असते. किवीमध्ये फायबर असते ज्यामुळे पचनशक्ती वाढते. तुम्ही तुमच्या आहारात किवी फळांचा समावेश केला पाहिजे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha