Side Effects Of Mouth Wash : कामाच्या रोजच्या धावपळीत अनेकजण प्रत्येक कामाचे सोपे उपाय शोधत असतात. आजकाल माऊथवाॅशचा वापर मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. लोक आपले दात आणि तोंड स्वच्छ करण्याकरता विविध ब्रँडचे माऊथवाॅशचा उपयोग करतात. सध्या हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तोंडात असणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी माऊथवॉशचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकाराच्या आजारांपासून वाचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्यासारख्या समस्यांपासून सुटका होत असते. त्यामुळे माऊथवॉशचा वापर करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांकडून दिला जातो. त्याचप्रमाणे माउथवॉशमुळे फ्रेशनेस येण्यासही मदत होत असते. पण याच माऊथवाॅशच्या वापरामुळे ओरल कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. बाजारात मिळणाऱ्या माऊथवाॅशमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा माऊथवॉश करण्याचा सल्ला देण्यात येतो.
आपण घरी कडुलिंब किंवा पुदिन्यापासून नैसर्गिक माउथवॉश तयार करू शकतो. याचा रोजच्या रोज वापर करायलाही हरकत नसते. यात कुठलेही केमिकल्स नसल्यामुळे त्याचा आरोग्यावर काहीही विपरित परिणाम होत नाही. माऊथवाॅश ऐवजी जर तुम्ही घरगुती वस्तूचा वापर करणं जास्त फायद्याचे ठरू शकते.
संशोधनात काय म्हटले आहे?
एका संशोधनात असे समोर आले आहे की, माऊथवाॅशमध्ये ईथेनाॅलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे तोंडात असणाऱ्या बॅक्टेरियामध्ये हा पदार्थ मिसळला जातो आणि अॅसिटाल्डिहाइडमध्ये बदलतो. यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून रोज माऊथवाॅश वापरणे शक्यतो टाळा.
मीठाच्या पाण्याचा करा वापर
मीठाचे पाणी हिरड्यांकरता फायदेशीर असते. हिरड्यांना सूज आलेली असेल किंवा हिरड्या दुखत असतील तरीही मीठाचे पाणी उपयोगी ठरते. एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून तोंड धुण्यासाठी वापरला जाऊ शकतो. बेकिंग सोडामुळे तोंडातील बॅक्टेरीया निघून जातात. यामुळे तोंडाला घाण वास येत नाही.
हायड्रोजन पेराॅक्साईड
हायड्रोजन पेराॅक्साईड हे जीवाणू नष्ट करण्यासाठी आणि दात पांढरे करण्यासाठी माऊथवॉश म्हणून वापरले जाऊ शकते.
खोबरेल तेलाचा वापर
तुमच्या तोंडात एक चमचा खोबरेल तेल ठेवा आणि 15-20 मिनिटे फिरवत राहा. असे केल्याने तोंडातील बॅक्टेरिया निघून जातात. आणि तोंडाच्या आरोग्यामध्ये बरीच सुधारणा होते.
इतर महत्वाच्या बातम्या