Local Megablock on 9 September, Sunday : मुंबईकरांनो आज, रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचा विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. खरेदीसाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी घराबाहेर पडणार असाल आणि ट्रेनने प्रवास करणार असाल तर, नियोजन करुनच घराबाहेर पडा. आज मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी लोकल रेल्वेने (Central Railway Megablock Today) प्रवास करणार असाल, रेल्वेचं वेळापत्रक पाहून आधी नियोजन करा. आज तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी लोकलच्या मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.


मध्य रेल्वेकडून रविवार, 9 सप्टेंबर रोजी देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचं वेळापत्रक कसं आहे जाणून घ्या.



  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत  सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबून   विद्याविहार स्टेशनवर योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.  

  • घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

  • पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत नेरुळ आणि किले दरम्यान बीएसयू लाईन आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गासह पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • नेरुळहून सकाळी 10.50 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत सुटणारी  ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.55 ते सायंकाळी 4.33 वाजेपर्यंत नेरूळकरीता सुटणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • नेरूळ येथून सकाळी 11.40 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या खारकोपरकडे जाणार्‍या डाउन बीएसयू लाईन सेवा रद्द राहतील आणि खारकोपरहून बेलापूरला जाणार्‍या डाउन  बीएसयू लाईन सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

  • खारकोपर येथून दुपारी 12. 25 ते 4.25 या वेळेत सुटणाऱ्या नेरूळकडे जाणार्‍या अप बीएसयू मार्गावरील सेवा रद्द राहतील आणि खारकोपरहून बेलापूरकडे जाणार्‍या अप बीएसयू मार्गावरील सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-विद्याविहार भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ठाणे- वाशी स्थानकांदरम्यान आणि ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

  • ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर दरम्यान बीएसयू लाईन सेवा उपलब्ध राहतील तसेच ब्लॉक कालावधीत नेरुळ- खारकोपर दरम्यान बीएसयू लाईन सेवा उपलब्ध राहणार नाहीत.