एक्स्प्लोर

Siblings Day 2022: एक दिवस लाडक्या भावंडांसाठी...जाणून घ्या कधी आणि कशी सुरु झाली ‘भावंड दिवसा’ची संकल्पना

Siblings Day 2022: आपले जीवन आणि आपण मोठे झाल्यावर जी व्यक्ती बनतो, त्याला आकार देण्यासाठी भावंडांची महत्त्वाची भूमिका असते.

Siblings Day 2022: आपण त्यांच्यावर प्रेम करतो, कधी कधी त्यांचा तिरस्कारही करतो, त्यांच्याशी भांडतो, सर्वात मौल्यवान आठवणीही शेअर करतो, त्यांच्याशी स्पर्धा करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्यांच्याशिवाय जगू शकत नाही! असे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे सदस्य म्हणजे आपली ‘भावंड’. ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि आपण नेहमीच सगळ्या गोष्टी पहिला त्यांच्याशी शेअर करतो.

आपल्या आई-वडिलांव्यतिरिक्त आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणून भावंडांसोबतचे आपले बंध खूप मौल्यवान आहेत. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आहे ‘भावंड’ दिवस! (Siblings Day 2022) दरवर्षी, 10 एप्रिलला ‘भावंड दिवस’ अर्थात ‘सिबलिंग डे’ साजरा केला जातो.

‘भावंडं दिवसा’चे महत्त्व आणि इतिहास

या खास दिवशी लहानपणापासून आपल्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल आणि त्यांच्या उपस्थितीने आपले जीवन अधिक चांगले बनवल्याबद्दल भाऊ आणि बहिणींचे आभार मानले जातात. आपले जीवन आणि आपण मोठे झाल्यावर जी व्यक्ती बनतो, त्याला आकार देण्यासाठी भावंडांची महत्त्वाची भूमिका असते.

या दिवशी, भावंडे भेटवस्तू देऊन, एकमेकांना मिठी मारून त्यांचे प्रेम व्यक्त करून, एकमेकांच्या आवडत्या गोष्टीत दिवस व्यतीत करून, नोट्स पाठवून आणि बरेच काही स्पेशल करून एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जर तुमचा एखादा चांगला मित्र असेल, जो तुमच्यासाठी मित्रापेक्षाही जास्त तुमचा भाऊ किंवा बहिणीसमान असेल, तर तुम्ही त्यांना या दिवशी शुभेच्छा देऊ शकता.

काय आहे या मागची कथा?

क्लॉडिया एवार्ट नावाच्या महिलेने अगदी लहान वयातच आपला भाऊ आणि बहीण गमावल्यानंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. पहिला ‘भावंड दिवस’ 1995 मध्ये साजरा करण्यात आला. भावंडांचं आपल्या जीवनात महत्त्व आणि त्यांची आपल्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका यावर जोर देणे, हा दिवस साजरा करण्याचा क्लॉडियाचा उद्देश होता. यासाठी तिने 10 एप्रिल हा दिवस निवडला, कारण या दिवशी तिची बहीण लिसेटची जयंती असते. याव्यतिरिक्त, तिने त्याच वर्षी ‘सिबलिंग डे फाउंडेशन’ची (SDF) स्थापना केली. SDF  अंतर्गत, परिस्थिती, जन्म आणि दत्तक विधान किंवा परस्पर कौटुंबिक समस्यांमुळे विभक्त झालेल्या भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: ‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget