एक्स्प्लोर

Sachin Tendulkar : 'तिळगुळ घ्या, गोड बोला', मकर संक्रांतीला सचिन तेंडुलकरनं तयार केले तिळगुळाचे लाडू, व्हिडीओ होतोय व्हायरल!

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या घरी स्वत:च्या हाताने तिळगुळ बनविले आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Sachin Tendulkar : सगळीकडे मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2023) धामधूम सुरु आहे. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सारेच उत्सुक आहेत. मकर संक्रांतीला तिळाच्या लाडूला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या आधीपासूनच घराघरांत तिळगुळ बनविले जातात. आणि हे तिळगुळ प्रत्येकाला वाटून 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' अशा शुभेच्छा दिल्या जातात. हा सण साजरा करताना आपले सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. नुकताच मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या घरी स्वत:च्या हाताने तिळगुळ बनविले आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सण म्हटला की त्यात आनंद, उत्साह, जल्लोष आणि प्रेमाचा गोडवा येतो. हा आनंद साजरा करताना सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीही तितकेच उत्साही असतात. असाच एक व्हिडीओ क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो स्वत: आपल्या हाताने तिळगुळ बनवताना दिसतोय. तसेच, तिळगुळ बनवताना तो तिळगुळ कसा बनवायचा याची रेसिपीही अत्यंत रंजक पद्धतीनं सांगतोय. या व्हिडीओच्या शेवटी त्याने सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

पाहा व्हिडीओ : 

या व्हिडीओमध्ये तिळगुळाचे लाडू बनवताना सचिन तेंडुलकरनं ते कशा पद्धतीने बनविले जातात याची रेसिपीही सांगितली आहे. हा व्हिडीओ बातमी लिहेपर्यंत 6 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सदेखील केल्या आहेत. अनेकांनी सचिनला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, काहींनी त्याचं कौतुक केलं आहे. 

मकर संक्रांतीचं महत्त्व : 

मकरसंक्रांतीला सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती असं म्हटलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या : 

Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा द्या; अन् सणाचा आनंद द्विगुणित करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget