एक्स्प्लोर

न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे काय? मेंदू अन् मज्जासंस्थावर होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं..

Early Stroke Symptoms and Life-Saving Treatment: ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढतो. तज्ज्ञांनी रूग्णांना काही सल्ले दिले आहेत.

Expert Tips for Better Neurological Health: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता तणाव, अपुरी झोप, संतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव, याचा थेट परिणाम एखाद्याच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर होतो. आज अनेक व्यक्ती विविध न्यूरोलॉजिकल समस्यांना सामोरे जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास आणि काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्यास या समस्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

मेंदू आणि मज्जातंतूंशी संबंधित आजार

मायग्रेन आणि डोकेदुखी : वारंवार होणारी डोकेदुखी किंवा मायग्रेन ही हल्ली एक सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे. ताणतणाव, अपुरी झोप, डिहायड्रेशन, वाढता स्क्रिन टाईम आणि अनियमित दिनचर्या यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. सतत डोकेदुखीमुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि जीवनाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो.

मज्जातंतूच्या वेदना (न्यूरोपॅथिक पेन): मधुमेह, मज्जातंतूंना झालेले नुकसान किंवा काही आजारांमुळे हात-पायात मुंग्या येणे, सुन्नपणा, टोचल्यासारखी वेदना किंवा जळजळ जाणवू शकते. ही लक्षणे वाढत असल्यास तात्काळ न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

स्ट्रोकचा धोका : उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॅाल, धूम्रपान आणि ताणतणाव यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. सांकेतिक भाषेत स्ट्रोकच्या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. 

B- बॅलेंस (Balance) - स्ट्रोकपीडित व्यक्तीच्या शरीरावरील संतुलन बिघडते. तो नीट बसू शकत नाही आणि उभा राहू शकत नाही.

E- आईज (Eyes) - स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला अचानक एका डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अंधुक दृष्टी येऊ लागली तर समजून घ्या की ही स्थिती स्ट्रोकशी संबंधित असू शकते. 

F-फेस (Face) - स्ट्रोकमध्ये, चेहरा एका बाजूला तिरकस होतो. यामध्ये त्या व्यक्तीला हसूही येत नाही किंवा चेहरा सरळ दिसत नाही असे घडते. 

A-आर्म्स (Arms)- स्ट्रोकमध्ये हात सैल होतात आणि त्यांची क्रिया नीट होत नाही. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर हातात जीव राहत नाही. 

S-स्पीक (Speak)- स्ट्रोकमध्ये पीडित व्यक्तीला बोलण्यात अडचण येते, त्याची जीभ अडखळू लागते. 

T-टाइम (Time)- स्ट्रोकमध्ये वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पक्षाघाताचा झटका आल्यास, वेळ न घालवता, रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचं आहे. शक्यतो उत्तम सुविधा असलेल्या रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. जिथे एमआरआय, सीटी स्कॅन आणि उत्तम आयसीयू सुविधा असतील.

वेळीच उपचार मिळाल्यास स्ट्रोकमुळे होणारे अर्धांगवायू आणि कायमचे अपंगत्व टाळता येऊ शकते. आयव्ही थ्रोम्बोलिसिस आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसारखे आधुनिक उपचार रुग्णासाठी जीवनरक्षक ठरू शकतात.

पार्किन्सन आजाराची लक्षणे:

पार्किन्सन आजार असलेल्या रुग्णांमध्ये स्नायूंचा कडकपणा, हालचाली मंदावणे आणि हातपाय कापणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार आणि व्यायामाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

झोपेचा अभाव : कमी झोपेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव ही त्याची लक्षणे आहेत. निरोगी मेंदूसाठी दररोज किमान ७ ते ८ तास शांत झोप अत्यंत गरजेची आहे.

आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. नियमित व्यायाम करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जातंतूंचे कार्य मजबूत होते. आहारात काजू, तेलबिया, मासे, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि अंडी यांचा समावेश करा. रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा. विशेषतः स्ट्रोक किंवा न्यूरोपॅथीचा धोका असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा श्वसनाचे व्यायाम करा. कोणतीही लक्षणे आढळल्यास ती दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मेंदू आणि मज्जासंस्था हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी, योग्य जीवनशैली आणि लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास अनेक न्यूरोलॉजिकल समस्या टाळता येऊ शकतात. तुमच्या न्यूरोलॉजिकल आरोग्यास प्राधान्य द्या आणि निरोगी आयुष्य जगा.

डॉ. सुनील कुट्टी( न्यूरोसर्जन, न्यूईरा हॉस्पिटल) 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget