Lumpy Skin Disease : दिवसेंदिवस राज्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर लम्पी आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनावरांना लसीकरण आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याचबरोबर आता शाळेतील शिक्षकांनी देखील लम्पी स्कीन आजाराबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जनजागृती सुरू केली आहे.
देशात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात देखील या आजार फैलावत आहे. त्यामुलं पशुपालक संकटात आहेत. राजस्थान आणि गुरजारमध्ये या आजारान थैमान घातलं आहे. याचा दुग्ध उत्पादनावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळं अहमगनगरमध्ये लम्पी आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. आता शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा उपक्रम राबवला जात आहे.
ज्यांच्या जनावरांचे गोठे स्वच्छ असतील त्यांना 101 रुपयांचे बक्षीस
एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्या-त्या विभागाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. सध्या राज्यात जनावरांमधील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 478 जनावरांना लम्पी आजाराची बाधा झाली आहे. पशुसंवर्धन विभागानं तातडीने यावर उपाय योजना करुन 217 जनावरानं उपचार करुन बरी झाली आहेत. लम्पीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या आजाराच्या लढाईत आता जिल्हा परिषद शिक्षकांनी देखील आपलं योगदान देण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. ज्यांच्या जनावरांचे गोठे स्वच्छ असतील त्यांना शाळेच्या वतीने 101 रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे.
जिल्ह्यात 17 जनावरांचा लम्पीमुळं मृत्यू झाला
अहमदनगर जिल्ह्यात गायींची संख्या 24 लाख आहे, तर म्हशींची संख्या 2 लाख आहे. सध्या 478 लम्पी बाधित जनावरे आहेत. त्यापैकी 217 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 608 गावांपैकी 552 गावात लम्पीचा धोका असून, या गावांमध्ये 6 लाख 71 जनावरे आहेत. सध्या 3 लाख 60 हजार जनावरांसाठी लसी उपलब्ध झाल्या आहेत. तर 2 लाख 10 हजार लसीकरण देखील पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 17 जनावरांचा लम्पीमुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लसींची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- 'जनावरांमध्येही आता दो गज दूरी', लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Lumpy Skin Disease : राजस्थानमध्ये लम्पी स्कीनमुळं पशुपालक चिंतेत, दूध उत्पादनात दोन लाख लिटरची घट, मुख्यमंत्री गेलहोतांचे पंतप्रधानांना पत्र