Nagpanchami 2023 : श्रावण महिना सुरु झाला आहे. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तसेच नागपंचमीचा सण आहे. श्रावण (Shravan 2023) महिन्यात सोमवारला अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. यंदाच्या नागपंचमीचा (Nagpanchami 2023) शुभ मुहूर्त काय आहे? नागाची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. 


यंदा नागपंचमीचा सण आज म्हणजेच (21 ऑगस्ट 2023 रोजी) आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. काही भागांत चिखलाचा नागदेवता करतात. तर काही ठिकाणी प्रतिकात्मक फोटोची पूजा करतात. काही ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा करतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करतात. 


नागपंचमी 2023 शुभ मुहूर्त (Nagpanchami Shubh Muhurat 2023) :


हिंदू दिनदर्शिकेनुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पंचमी तिथी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.21 वाजता सुरू होईल आणि पंचमी तिथी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता समाप्त होईल. नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे 5.53 ते 8.30 अशी असेल.


नागपंचमीला नागदेवतेची पूजा कशी करावी?


नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी काल सर्प दोष पूजेसोबत राहू दोषाचीही पूजा करता येते. पंचमीला दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन करावे. नागपंचमीच्या दिवशी लोक भिंतीवर नागाचा आकार करून पूजा करतात. त्यानंतर नागदेवतेला आवाहन करावे. त्यांना हळद, लाह्या, तांदूळ घालून तिलक लावावा. फुले अर्पण करावी. उदबत्ती करावी. कच्च्या दुधात साखर मिसळून नागदेवतेला पूजा करावी. त्यानंतर नागदेवतेची आरती करावी. 


नागपंचमीचे महत्त्व : (Importance Of Nagpanchami ) :


नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे लवकर दूर होतात. तसेच, जर कुंडलीत राहु आणि केतू पासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात अशी मान्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी