Diwali 2023 : सध्या दीपावली (Diwali) सणाची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील (Hindu Religion) सर्वात महत्त्वाचा सण आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिजे जाते. सर्व जण सध्या दिवाळीची साफसफाई आणि खरेदी यामध्ये व्यस्त आहेत. दीपावली हा दिव्यांचा सण आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजा, पाडवा आणि भाऊबीज हे सर्व दिवस जरी शुभ आणि लाभदायक मानले जातात.
तुमचे घर स्वच्छ आहे का?
दिव्यांचा सण (Festival of Lights) दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. लक्ष्मी मातेला (Goddess Laxmi) प्रसन्न करण्यासाठी सर्व घरांमध्ये साफसफाईचं (Cleaning) काम जोरात सुरू आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan 2023) दिवशी केलेले कोणतेही काम शुभ असते आणि फलदायी ठरतं असं म्हटलं जाते. लक्ष्मी माता (Mata Laxmi) खूश झाल्याने आर्थिक अडचणी (Financial Problems) दूर होऊन होतात आणि सुख-समृद्धी नांदते, पण यासाठी तुम्हाला दिवाळी साजरी करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे.
दिवाळीत स्वच्छतेला खास महत्त्व
दिवाळी हा प्रकाशाचा सण असून या काळात स्वच्छतेला ही खास महत्त्व आहे. वास्तू आणि फेंगशुईनुसार (Feng Shui), दिवाळीमध्ये सुख, सौभाग्य आणि समृद्धी मिळविण्यासाठी स्वच्छता, सजावट, रोषणाई, रांगोळी हे कशाप्रकारे करावं सविस्तर जाणून घ्या.
दिवाळीत घराची स्वच्छता कशी करावी?
- फेंगशुईनुसार घरात सुख-समृद्धी येऊ नांदण्यासाठी दिवाळीत घराची स्वच्छता कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती वाचा.
- घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी, सर्वात आधी घरातून निरुपयोगी वस्तू काढून टाका. घरामध्ये क्रॉकरी, तुटलेल्या किंवा फुटलेल्या सजावटीच्या वस्तू असतील तर त्या लगेच काढून टाका.
- जर तुम्ही लाईटींग लावत असाल तर, खराब झालेले बल्ब, ट्यूब लाईट्स देखील ताबडतोब बदला.
- संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने चांगलं धुवा आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसा. फेंगशुईनुसार, खाऱ्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
- यानंतर सर्व खोल्यांच्या मध्यभागी सुगंधी अगरबत्ती लावा आणि सुमारे दोन तास जळू द्या, यामुळे घर शुद्ध होऊ आल्हाददायक वातावरण निर्माण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :