Chandra Grahan 2023 : ज्योतिष आणि धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 पासून सुरू होईल आणि 02:23 पर्यंत चालेल. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आहे, धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे.


चंद्रग्रहण कसे होते?


चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, चंद्राला त्याच्या सावलीने झाकते, त्यानंतर चंद्राचा काही भाग अदृश्य होतो. म्हणजेच सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नाही, या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहणांचे तीन प्रकार आहेत - पूर्ण, आंशिक आणि उपच्छाया चंद्रग्रहण. आज होणारे ग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण असेल.


या ठिकाणी दिसणार चंद्रग्रहण


हे चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होईल. आज रात्री उशिरा होणारे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. याशिवाय हे चंद्रग्रहण नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे.


भारतातील 'या' शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार


भारतात मध्यरात्रीनंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, सूरत, जयपूर, कानपूर, लखनौ, नागपूर, कोईम्बतूर, नाशिक, रायपूर, भोपाळ, जोधपूर, प्रयागराज, डेहराडून आणि पाटणा यासह भारतातील इतर भागात चंद्रग्रहण दिसेल.



चंद्रग्रहण कसे पाहाल?


चंद्रग्रहण पाहण्यासाठी विविध प्रकारच्या खगोलीय दुर्बिणींचा वापर केला जातो. चंद्रग्रहण पाहण्याने कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. उघड्या डोळ्यांनीही ते पाहता येते. विज्ञानानुसार चंद्रग्रहण पाहिल्याने डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण अनेक ठिकाणी दुर्बिणीद्वारे लोकांना दाखवले जाणार आहे. याशिवाय TimeandDate.com या वेबसाईटवर आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता. याशिवाय 'Royal Observatory Greenwich'च्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही हे चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता.


चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी


आज होणारे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतातही प्रभावी ठरेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुतक कालावधी सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतरच संपेल. सुतक काळात शुभ आणि शुभ कार्ये वर्ज्य आहेत. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा केली जात नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा


Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहण, कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी! 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, शास्त्रात काय म्हटंलय?