Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहण, कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी! 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, शास्त्रात काय म्हटंलय?
चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी स्वत:ची अत्यंत काळजी घ्यावी. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, या दिवशी चंद्र पाहू नये. असे केल्याने तुमच्या न जन्मलेल्या मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रग्रहण काळात स्वयंपाक करणे आणि खाणे टाळा. ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे शुभ नाही, या काळात अन्न न खाण्याचा प्रयत्न करा.
ग्रहणकाळात घरातील देवघर झाकून ठेवावे. सुतक कालावधी सुरू झाल्यानंतरच आपले मंदिर झाकून घ्यावे. सुतक काळात देवाची पूजा करणे शुभ नाही.
ग्रहणाच्या दिवशी गरजू लोकांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करा. त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी दान करा. अन्न, पैसे किंवा वस्त्र देऊ शकता
ग्रहणाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य सुरू करू नका. ग्रहणाच्या दिवशी असे करणे अजिबात शुभ नाही.
चंद्रग्रहणाच्या दिवशी पूजा आणि ध्यान करणे विशेषतः फलदायी असते. या दिवशी देवाची आराधना करा, मंत्रोच्चार करा आणि जास्तीत जास्त वेळ मौनात घालवण्याचा प्रयत्न करा, असे करणे चांगले आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)