Relationship Tips : अनेकांना आपल्या जोडीदारापासून बऱ्याच गोष्टी लपवण्याची सवय असते, प्रत्येक वेळेस गोष्टी लपवणारा जोडीदार या गोष्टीला जास्त महत्व देत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? तुमची हीच सवय तुमच्या अंगलट येऊ शकते, अनेक संशोधनात असं आढळून आलंय की, जर तुम्ही नात्यातील काही गोष्टी लपवून ठेवल्या, तुमच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत, तर याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो. जाणून घ्या
जोडीदाराच्या मनात शंका निर्माण करू शकते
जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही लपवले तर यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात शंका निर्माण करू शकते. अशा वेळी त्या गोष्टी लपवण्याऐवजी बोलून उघड केल्याने नात्याची ताकद वाढते. यामुळे दोघांमधील नातेसंबंधावर विश्वास वाढतो आणि तुमची समस्याही सुटते. जर पती आपल्या पत्नीशी विचारपूर्वक बोलत असेल आणि पत्नी त्याच्यासमोर तिच्या भावना व्यक्त करू शकत नसेल तर हे त्यांचे नाते कमकुवत असल्याचे लक्षण आहे. अशात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संभाषण करणे महत्त्वाचे आहे.
नातं मजबूत करते
अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही नात्यातील काही गोष्टी लपवून ठेवल्या आणि तुमच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. त्यामुळे अविश्वास निर्माण होऊ लागतो. तुमच्या जोडीदाराला मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिल्याने नाते अधिक घट्ट होते.
नात्यात तिसऱ्या व्यक्तीला स्थान नाही
ज्या दिवशी पती-पत्नीच्या नात्यात तिसरी व्यक्ती येते, त्यादिवशी नात्यात दुरावा निर्माण होतो. मग ती आई, बहीण, भाऊ, मित्र असो. गोष्टी न लपवता सकारात्मक पद्धतीने आणि उघडपणे केलेले संभाषण तिसऱ्या व्यक्तीला नात्यात येण्याची संधी देत नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचे म्हणणे समजून घेण्यासाठी दुसऱ्याची मदत घेतली तर नात्यातील अंतर वाढू लागते. आपण स्वत: संभाषणातून समजून घेतल्यास अधिक चांगले होईल.
स्वतःमध्ये सुधारणा
अनेक वेळा जेव्हा तुमचा पार्टनर त्याच्या आवडी-निवडी बाबततुमच्याशी मोकळेपणाने बोलतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला फक्त चांगल्या प्रकारे समजून घेत नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अनेक सवयी आणि चांगल्या गुणांची देखील माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही एक चांगली व्यक्ती बनू शकता
भावनिक बंध
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलता तेव्हा तुम्हाला केवळ भावनिक बंधनेच वाटत नाहीत, तर त्यामुळे तुमचे शारीरिक संबंधही चांगले होतात.
आजपासूनच ही सवय सुधारा
जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही गोष्टी लपवत असाल तर आजपासूनच ही सवय सुधारा. तुमची ही सवय कोणतेही नाते कमकुवत होण्याचे कारण बनू शकते. नात्यात जेव्हा एकमेकांपासून काही गोष्टी लपवल्या जातात तेव्हा त्यामुळे विश्वास नष्ट होतो आणि नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचते.
स्वार्थी बनू नका
कोणतेही नाते तेव्हाच चांगले चालते जेव्हा त्यात त्यागाची भावना असते. नात्यात जोडीदाराच्या बोलण्याला आणि ध्येयांना महत्त्व देण्याऐवजी फक्त स्वतःच्या आवडीनिवडीला प्राधान्य दिले तर नातं कमकुवत होऊ लागतं. जेव्हा पार्टनरला आपले महत्त्व कमी होत आहे असे वाटू लागते, तेव्हा नाते बिघडू लागते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>
Health : अवघ्या काही मिनिटांत तुमचा तणाव दूर होईल,फक्त ही 3 योगासने करा, फ्रेश वाटेल!