IRCTC Tour : आजकालच्या तरुणाईला काहीतरी तुफानी करायचं असतं. म्हणून ते आपल्या मित्रांसोबत वेगवेगळे प्लॅन करत असतात, जसे की ट्रेकिंग, एडवेंचर ट्रीप वैगेरे.. वैगेरे.. पण तुम्हाला माहित आहे का? भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) अशा प्रकारच्या टूर पॅकेजची सुविधा आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ट्रीप प्लॅन करू शकता. जर तुम्ही तुमच्या मित्रांच्या गटासह साहसी सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भारतीय रेल्वे पॅकेजसह जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला फक्त टूर पॅकेज बुक करावे लागेल, त्यानंतर प्रवासाची संपूर्ण तयारी भारतीय रेल्वेकडून केली जाईल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या नवीन टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. या पॅकेजमधून प्रवास करणे फायदेशीर आहे, कारण यामध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते.


 


लदाख/लेह टूर पॅकेज



हे पॅकेज 27 एप्रिलपासून सुरू होत आहे.
हे 6 रात्री 7 दिवसांचे टूर पॅकेज आहे. या टूर पॅकेजद्वारे दर आठवड्याला तुम्ही सहलीला जाऊ शकता.
पॅकेज फी- या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 52,400 रुपये भरावे लागतील.
तुम्हाला फक्त 52,400 रुपयांमध्ये कॅम्पमध्ये राहण्याची संधी मिळेल. 
या पॅकेजमध्ये हॉटेल, फ्लाइट तिकीट, जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खर्च समाविष्ट आहे.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून https://www.irctctourism.com पॅकेज बुक करणे खूप सोपे आहे.


गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर प्लॅन



जर तुम्हाला एप्रिलमध्ये हिरव्यागार पर्वतांचे सुंदर दृश्य पहायचे असेल, तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या या पॅकेजसह सहलीला जाऊ शकता.
हे पॅकेज 20 एप्रिलपासून चंदीगड येथून सुरू होत आहे.
हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला एकत्र भेट देण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी - तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती 30,800 रुपये द्यावे लागतील.
फक्त 30,800 रुपयांमध्ये तुम्हाला फेरीचे तिकीट, 5 नाश्ता आणि 5 डिनर आणि एक रात्र हाऊस बोटमध्ये घालवण्याची संधी मिळेल. हॉटेलचा खर्चही पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.
मित्रांसोबत हँग आउट करण्यासाठी हे सर्वोत्तम पॅकेज आहे.


 
कनेची टूर पॅकेज


पॅकेजमध्ये तुम्ही रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, बर्मा ब्रिज, रोप वॉकिंग, रिंग वॉक, ट्रॅम्पोलिन आणि झिप लाइनचा आनंद घेऊ शकता.
पॅकेजमध्ये लक्झरी टेंटमध्ये 2 रात्री घालवण्याची संधी असेल.
03 नाश्ता, 03 दुपारचे जेवण आणि 03 रात्रीचे जेवण.
सकाळ संध्याकाळ चहा आणि प्रेक्षणीय स्थळी बसची सोय
हे पॅकेज 2 रात्री आणि 3 दिवसांसाठी आहे.


 
मनाली आणि शिमला टूर पॅकेज


या पॅकेजसाठी तुम्ही चंदीगडहून दररोज तिकीट बुक करू शकता.
हे टूर पॅकेज 7 रात्री आणि 8 दिवसांसाठी आहे.
पॅकेज फी - तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 24115 रुपये आहे.
फक्त 24,115 रुपयांच्या पॅकेजमध्ये राउंड ट्रिप तिकीट, 7 नाश्ता आणि 07 डिनर आणि हॉटेलचा खर्च समाविष्ट आहे.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


 


Travel : विदेशातील 'थायलंड' विसराल, जेव्हा भारतातील 'मिनी थायलंड' पाहाल, कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख!