Gudi Padwa 2024: महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2024) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे. गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. ज्योतिषांच्या मते यंदाचा गुढीपाडवा अतिशय खास आहे कारण पाडव्याला अनेक शुभ योग एकाच वेळी बनत आहे. या योगांमध्ये जर तुम्ही त्रिमूर्तीची उपासना केली तर वर्षभर घरात सुख, समृ्द्धी राहील तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतील. चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याला कोणते शुभ योग तयार होत आहे.
गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024 Shubh Muhurta)
पंचांगानुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी समाप्त होईल, त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. 9 तारखेला सकाळी 06:02 ते 10:17 मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून गुढी उभारू शकता.
सर्वार्थ सिद्धी योग
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. हा योग 9 एप्रिल सकाळी 07 वाजून 32 ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल रोजी पहाटे 05 वाजून 06 मिनिटापर्यंत असणार आहे. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते. तसेच देवाकडून आशीर्वाद मिळतात .
अमृत सिद्धी योग
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीलाही अमृत सिद्धी योग तयार होत आहे. हा योग 9 एप्रिल सकाळी 7 वाजून 32 मिनिटे ते 10 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 6 मिनिटापर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्र अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी 06.02 ते 07.32 अशी आहे. याशिवाय गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस शुभ असून कोणतेही शुभ कार्य तुम्हाला करता येणार आहे सकाळी 10:09 ते रात्री 08:30 पर्यंत तुम्हला खरेदी करता येणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: