एक्स्प्लोर

Relationship Tips : तुटत असलेल्या नात्याला 'असं' द्या जीवदान! सर्वात प्रभावी टिप्स जाणून घ्या, पुन्हा भांडण होणार नाही

Relationship Tips : जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जात आहे, तर आता तुम्हाला रिलेशनशिपची कमान तुमच्या हातात घेण्याची गरज आहे.

Relationship Tips : असं म्हणतात ना, प्रेमाचा धागा हा अत्यंत नाजूक असतो. कारण नातं हे विश्वासाच्या आधारावर उभं असतं. मात्र आजकाल बदलत्या काळानुसार नात्याचे महत्त्व कमी होतानाचं चित्र दिसत आहे. त्यामुळे नाती सहज तुटत आहेत. नात्यात अहंकार आल्याने आजकाल तडजोड करायला कोणीही तयार होत नाही. आप अनेकदा ऐकतो, आजकाल नात्यात ब्रेकअपच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्यापासून हळूहळू दूर जात आहे, तुम्हाला वेळ देत नाही किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, तर आता तुम्हाला रिलेशनशिपची कमान तुमच्या हातात घेण्याची गरज आहे.

नातं तुटायला लागलं की, एकमेकांचे चांगले गुणही वाईट वाटायला लागतात

अगदी घट्ट आणि वर्षानुवर्षे जुने नातंही तुटायला लागलं की एकमेकांचे चांगले गुणही वाईट वाटायला लागतात. कोणतंही नातं टिकवायचं असेल तर त्यामध्ये मेंदूपेक्षा जास्त ह्रदयाचा वापर करावा लागतो. यासाठी रिलेशनशिपमध्ये असलेल्या दोघांनाही आपली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडावी लागते. नात्यात अप्रामाणिकपणा मिसळला की ते नातं बिघडायला लागते. तुटलेले नाते पुन्हा कसे उभारायचे ते जाणून घ्या.

गैरसमज

नात्यात बराच वेळ एकत्र घालवताना गैरसमज होणे सामान्य आहे. पण जर ते वेळेवर संपले नाहीत तर ते नाते तुटण्याचे सर्वात मोठे कारण ठरते. जर तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. यामुळे भांडणाचे कारण कळेल आणि ते सुधारण्यासही मदत होईल.

वैयक्तिक स्पेस

कोणी कितीही जवळचे असले तरी त्यांना वैयक्तिक स्पेस हवी असते. प्रत्येकाच्या स्वतःच्या आवडी-निवडी, मित्र आणि नातेवाईक असतात. एकमेकांमध्ये खूप भांडण किंवा वाद होत असतील तर काही काळ एकमेकांना स्पेस द्या. यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला मिस करेल आणि नातं सुधारण्याचा प्रयत्न करू लागेल.

स्वतःच्या चुका मान्य करणं महत्वाचं

भांडणाच्या वेळीच जोडीदाराला दोष देऊ नका. शांत झाल्यावर तुमच्या चुका समजून घ्या. तसेच जोडीदारासमोर तुमची चूक मान्य करा. तुमच्या जोडीदारासमोर तुमची चूक मान्य केल्याने तुम्ही लहान होणार नाही, उलट नातं आणखी घट्ट होण्यास मदत होईल, हे लक्षात ठेवा.

एकमेकांना आधार द्या

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यावर एकमेकांना साथ देण्याचे वचन देता. ब्रेकअप किंवा घटस्फोट रोखायचा असेल तर एकमेकांना आधार द्या, एकमेकांना महत्त्व द्या. तुमच्या जोडीदाराला वेळोवेळी जाणवून द्या की तो तुमच्यासाठी खास आहे. यासाठी जर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील तर अजिबात संकोच करू नका.

हेही वाचा>>>

Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget