Plastic Bottle Water : आपण प्रवासात किंवा अन्यवेळी नेहमीच पाण्याची बाटली सोबत ठेवतो. पण प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे हे आरोग्यास चांगलं आहे की वाईट याबाबत मात्र आपल्याला कल्पना नसते.
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं चांगलं की वाईट? याबाबत आज जाणून घेऊयात...
1)अनेक प्रकारच्या प्लास्टिक बिसफेनोल ए (BPA) हे एक घातक रसायन आहे. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती BPA विरहीत असेल, याकडे लक्ष द्या.
2) बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते.
3) काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकतं, मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते.
4) पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं. कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं. त्यामुळे पाण्याची प्लॅस्टिक बाटली वापरणार असाल, तर ती सावलीत ठेवा.
5) जर तुम्ही लिंबू पाणी सोबत ठेवत असाल, तर काचेच्या बाटलीचाच पर्याय उत्तम ठरू शकतो. कारण प्लॅस्टिक बाटलीतील रसायनामुळे त्याचा स्वाद बिघडतो.
6) प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. दुसरीकडे प्लॅस्टिक बाटलीपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणं सहज शक्य आहे.
7) लहान मुलांनाही काचेच्याच बाटलीतून दूध पाजणं फायदेशीर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
8) काचेची बाटली फुटण्याचा धोका असतो, त्यामुळे बाटली घेताना त्यावर सिलिकॉन कव्हर असलेली बाटली निवडा.
9) प्लॅस्टिकच्या प्रत्येक बाटलीचा पुनर्वापर करता येऊ शकत नाही. कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांचाही पुनर्वापर करता येत नाही. या बाटल्यांच्या वरच्या बाजूला एक त्रिकोण असतो, त्यावर 1 लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ या बाटलीचा केवळ एकदाच वापर होऊ शकतो. या बाटल्यांचा पुनर्वापर केल्यास, तुम्ही आजारी पडू शकता.