Weight Loss Diet : फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. काही लोक वेगवगेळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ब्रेकफास्टकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पोहे, इडली, दलिया, अंड आणि डोसा असे पदार्थ लोक ब्रेकफास्टमध्ये खातात. पण काही पदार्थ सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाल्याने तुमचे वजन वाढू शकते. जाणून घेऊयात असे पदार्थ जे ब्रेकफास्टमध्ये खाल्याने वजन वाढते. 
 
केक, कुकीज- केक आणि कुकीज या पदार्थांमध्ये मैदा आणि तूप असते. तसेच केक आणि कुकीज तयार करताना क्रिमचा देखील वापर केला जातो. त्यामुळे केक आणि कुकीज खाल्याने वजन वाढू शकते. म्हणून ब्रेकफास्टमध्ये केक आणि कुकीज खाणे टाळा.


नूडल्स-  ब्रेकफास्टमध्ये अनेक लोक नूडल्स खातात. पण नूडल्समध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन वाढते. म्हणून ब्रेकफास्टमध्ये नूडल्सचा समावेश करू नये. 


फ्रूट ज्यूस- मार्केटमध्ये मिळणारे फ्रूट ज्यूस सकाळी ब्रेकफास्ट करताना घेऊ नयेत. तुम्ही घरी तयार केलेले फ्रूट ज्यूस सकाळी पिऊ शकता. 


तळलेले पदार्थ खणे टाळा- सकाळी ब्रेकफास्टमध्ये तळलेले पदार्थ खाणे टाळा. कचोरी, भजी इत्यादी तळलेले पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाऊ नयेत.


जिऱ्याचं पाणी प्यायल्याने झटपट कमी होईल वजन; जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत  
ब्रेकफास्ट न करण्याचे तोटे
एका रिपोर्टनुसार, ब्रेकफास्ट  न करण्याची सवय असणाऱ्या महिलांना टाईप 2 मधुमेहाचा सर्वाधिक धोका असतो. तर, नोकरीमध्ये व्यग्र असणाऱ्या आणि सकाळचं भोजन न करणाऱ्या महिलांमध्ये टाईप 2 मधुमेहाचा धोका 54 टक्के असल्याची बाब समोर आली. आरोग्यदायी असा ब्रेकफास्ट करणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचा धोका अतिशय कमी असतो. अनेक निरीक्षणांतून हेसुद्धा लक्षात आलं आहे की, ब्रेकफास्ट न करणं हे स्थुलतेचं कारणंही ठरु शकतं. 


टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित