Health Tips : हळदीचे दूधच नाही, तर हळदीचे पाणी देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. जर, तुम्ही हळदीचे पाणी पिणे टाळत असाल, तर आजच याची सवय लावा. कारण, त्याचे जबरदस्त फायदे तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकतात. याने शरीरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. दुधासोबत हळदीचे सेवन केल्याने फायदा होतो असे म्हणतात. पण, हळदीचे पाणी सेवन केल्यानेही तितकेच फायदे मिळतात.


हळदीचा आहारात समावेश केल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. हळदीमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. हळदीमध्ये पोली फेनोल असते. ज्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ओबेसिटी हे गुण असतात. हे गुणधर्म शरीराची जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. यासोबतच हळदीचे नियमित सेवन केल्याने पोटात असलेल्या 'बाइल' चे प्रमाणही वाढते. बाइलमुळे चरबी कमी होते.


रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त


हळदीचा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही हळदीचा वापर केला जातो. हळद केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर शरीरातील अतिशय गंभीर समस्या दूर करण्यासाठीही ती फायदेशीर मानली जाते. त्वचेचे सौंदर्य असो वा रोगप्रतिकारक शक्ती, हळदीचा वापर प्रत्येक प्रकारे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.


अनेक प्रकारे केला जातो हळदीचा वापर


हळदीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. बहुतेक लोक दुधात हळद मिसळून त्याचे सेवन करतात. वास्तविक, हळदीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराच्या अनेक समस्या कमी करू शकतात.


सांधेदुखीमध्येही फायदेशीर


याशिवाय जखम भरण्यासाठी हळदीचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हळदीचे पाणी सांधेदुखीमुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.