Navratri 2022 : सप्टेंबर (September) महिना सुरु होताच विविध सणांची चाहूल लागते. अशा स्थितीत नवरात्रोत्सव (Navratri 2022) सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात मनमुराद गरबा (Garba) खेळता जाणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये तसेच गरबा प्रेमींमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. गरबा म्हटला की गाणी आलीच. आणि याच गरब्यांच्या गाण्यांमध्ये बॉलिवूडही मागे नाही. अगदी 'खूबसुरत' चित्रपटातील 'घुंगट मे चॉंद होगा' गाणं असो किंवा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील 'ढोलीडा' गाणं असो प्रत्येकजण या गाण्यांवर ठुमके मारताना दिसतात. अशाच काही बॉलिवूड चित्रपटांतील गाण्यांची यादी आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत.   


1. छोगाडा : लवयात्री - बॉलिवूड चित्रपटातील लवरात्री (Loveyatri 2018) हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 'छोगाडा' (Chogada) या गाण्याने प्रेक्षकांना पार वेडं केलं होतं. 



2. नगाडा : राम लीला - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'राम लीला' (Ram Leela) या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात नगाडा हे गाणं फार प्रसिद्ध झालं. तसेच या गाण्यातील दीपिकाचा लूकही विशेष लक्षणीय होता. 



3. ढोलिडा : गंगूबाई काठियावाडी - नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा हे गाणं देखील फार दमदार आहे. या गाण्यात आलिया भट्टचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांच्या समोर आला होता. 



4. ढोली तारो ढोल बाजे : हम दिल दे चुके सनम - गरबा म्हटलं की 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'ढोली तारो ढोल बाजे' हे गाणं वाजणार नाही हे केवळ अशक्य. आतापर्यंतच्या प्रत्येक नवरात्रीत सर्वाधिक वाजवलं जाणारं हे गाणं आहे. 



5. घुमर : पद्मावत - 'पद्मावत' (Padmaavat) हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला. राजपूत घराण्यातील 'घुमर'(Ghoomar) हे गाणं देखील प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. 



5. राधे राधे : ड्रीम गर्ल - 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'राधे राधे' हे गाणं देखील गरब्याची रंगत वाढवणारं आहे. 



6. घुंगट में चॉंद होगा - खुबसूरत चित्रपट 



घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं.  या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचं विशेष महत्त्व आहे. तसेच दांडिया, गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. घागरा आणि लेहेंगा परिधान करुन अनेक लोक गरबा आणि दांडिया खेळतात. 


महत्वाच्या बातम्या :