Navratri Ethnic Attire :  26 सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला (Shardhiy Navaratri) सुरुवात होत आहे. नऊ दिवस असणाऱ्या या उत्सवात देवाची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं.  या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचं विशेष महत्त्व आहे. तसेच दांडिया, गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. घागरा आणि लेहेंगा परिधान करुन अनेक लोक गरबा आणि दांडिया खेळतात. नवरात्रीमध्ये सुंदर आणि स्टायलिश दियासचं असेल तर हे एथिनिक (Ethnic Dresses) लूक तुम्ही करु शकता. 


साडी
नवरात्रीमध्ये तुम्हाला जर एलिगेंट आणि ग्रेसफुल दिसायचं असेल तर तुम्ही साडी नेसू शकता. नवरात्रीमध्ये रेड, ऑरेंज आणि पिंक कलरची बांधणी प्रिंट असणारी साडी नेसल्यानं सुंदर आणि स्टायलिश दिसाल. फ्लोरल प्रिंट साडी अन् स्टोन किंवा मोत्यांचे वर्क असलेला ब्लाऊज असा लूक देखील नवरात्रीमध्ये तुम्ही करु शकता.  
 
लाँग कुर्ता आणि जिन्स 
मुलींप्रमाणेच मुलांनाही नवरात्रीमध्ये कसा लूक करायचा? सा प्रश्न पडत असेल. मुलं जिन्स आणि लाँग कुर्ता हा लूक करु शकता. नवरात्रीच्या रंगाप्रमाणे कुर्ता, त्यावर ट्रेडिशनल जॅकेट आणि जिन्स किंवा पायजमा असा लूक तुम्ही करु शकता. 
 
शरारा  किंवा घागरा (Lehenga)
शरारा किंवा घागरा हा लूक सध्या ट्रेंड होत आहे. अनारकली ड्रेस देखील तुम्ही ट्राय करु शकता. मल्टी लेयर्ड, मल्टी कलर्ड आणि फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा देखील तुम्ही परिधान करु शकता. याच बरोबर घागरा परिधान केल्यावर ट्रेडिशनल इअरिंग्स आणि मोजडी तुम्ही परिधान करु शकता. प्रिंटेड क्रॉप टॉप आणि प्लेन प्लाजो असा लूक देखील तुम्ही करु शकता. 


ज्वेलरी 


ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चांगली ज्वेलरी देखील परिधान करावी लागेल. ऑक्सिडाइज ज्वेलरी, नोज रिंग, स्टोनचे इअरिंग्स आणि सेट अशा प्रकारच्या ज्वेलरी तुम्ही साडी आणि घागरा या लूकवर परिधान करु शकता. ट्रेडिशनल लूकवर हेवी आणि डिझायनर ज्वेलरी चांगली दिसते. मोठे कानातले किंवा हेवी वर्क केलेला नेकपिस तुम्ही ट्रेडिशनल लूकवर परिधान करु शकता. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :