Tips To Stop Excessive Sweating : उन्हाळ्यात घाम येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण काही लोक असे असतात जे सतत घामाने भिजलेले असतात. घामामुळे शरीराला दुर्गंधी येत राहते, सतत चिकटपणा जाणवतो. याशिवाय डिहायड्रेशनची समस्या देखील जाणवते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही घामाच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती.


मसालेदार पदार्थ खाणे टाळा


जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे बंद करा. कारण जेव्हा तुम्ही मसालेदार पदार्थांचं सेवन करता तेव्हा आपले शरीर ही उष्णता काढून टाकते आणि शरीर थंड होण्यासाठी घाम येऊ लागतो. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात घाम येण्याची प्रक्रिया गतिमान होते, त्यामुळे आपल्या आहारातून शक्यतो मसालेदार पदार्थ टाळा.


कॅफिन टाळा


जर तुम्ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करत असाल तर तुम्ही ते टाळावे. कारण कॅफिनपासून बनवलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे शरीरातून जास्त घाम येतो. अशा परिस्थितीत तुम्ही कॉफी किंवा चहाचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा अजिबात करू नये.


सुती कपडे घाला


उन्हाळ्यात नेहमी सुती कपडे घाला ज्यात घाम सुकणे सोपे जाईल. हे शरीरातील घाम सहज शोषून घेते आणि ते लवकर कोरडे देखील होण्यास मदत करतात.


योगा करा


उन्हाळ्यात जर तुम्ही योगा तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केलात तर यामुळे तुम्हाला घामाच्या समस्येपासूनही आराम मिळेल. योग शरीराच्या मज्जातंतूंना शांत ठेवते आणि जास्त प्रमाणात घाम निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कार्य करते.


द्रव पदार्थांचे सेवन करा


उन्हाळ्यात शक्यतो द्रवपदार्थाचे सेवन करा. ताज्या फळांच्या रसाचा आहारात समावेश करा. सकाळी कॉफी किंवा चहा पिण्याऐवजी थंड रस प्या. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रणात येईल आणि जास्त घाम शरीरातून बाहेर पडणार नाही. शरीर स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. उन्हाळ्यात रोज आंघोळ करा. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकून तुम्ही घामावर नियंत्रण ठेवू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे