Shah Rukh Khan :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या(Shaharukh Khan) 'मन्नत' बाहेर 300 पेक्षा अधिक चाहत्यांनी त्याच्या आयकॉनिक पोज देऊन विश्वविक्रम घडवला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील करण्यात आली आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान याला त्याच्या चाहत्यांनी अनोखी भेट दिली आहे. पठाण या गाण्यावर जवळपास 300 पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेत विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 30 सेकंदाहून अधिक काळ शाहरुखच्या आयकॉनिक पॉजमध्ये उभे राहायचे होते. यासाठी चाहत्यांनी पठाण या गाण्याची निवड केली.


विशेष बाब म्हणजे या विश्वविक्रमासाठी जवळपास 250 लोकांची आवश्यकता होती. मात्र यामध्ये जवळपास 300 हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. शाहरुखचे चाहते हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. मन्नत बाहेर तर अनेकदा शाहरुखच्या चाहत्यांची झुंबड असते. शाहरुखची एक आयकॉनिक पोज पाहण्यासाठी चाहते देशाच्या कानाकोपऱ्यातून मन्नतबाहेर जमा होतात. शाहरुखच्या याच आयकॉनिक पोजचा विश्वविक्रम करुन चाहत्यांनी शाहरुखला विशेष अशी भेट दिली आहे. 


शाहरुख देखील चाहत्यांच्या आनंदात सहभागी


शाहरुखला नेहमीच त्याच्या चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. शाहरुखने देखील अनेकदा त्याच्या चाहत्यांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. चाहत्यांसाठी मन्नत बाहेर येऊन आयकॉनिक पोज देण्याची त्याची सवय ही कित्येकांच्या आवडीची आहे. यावेळी देखील शाहरुख त्याच्या चाहत्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. ज्यावेळी मन्नत बाहेर चाहत्यांनी हा विश्वविक्रम घडवला त्यावेळी शाहरुख देखील चाहत्यांच्या जल्लोषामध्ये सहभागी झाला.  यावेळी गिनीज बुक कडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर शाहरुखने त्याची स्वाक्षरी करुन चाहत्यांना धन्यवादाचा संदेश लिहिला आहे. 


एबीपी न्यूजच्या कॅमेरामध्ये चाहत्यांचा हा आनंद टिपण्यात आला आहे. तसेच यासाठी करण्यात आलेल्या नृत्याचे नृत्यदिग्दर्शन श्वेता तिवारी यांनी केले आहे. तसेच एबीपी न्यूजच्या कॅमेरासमोर या चाहत्यांनी पठाणच्या गाण्यावर थिरकले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे करण्यात आलेला हा विश्वविक्रम पठाण चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता. ज्याचे 18 जून रोजी पठाण चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियर दरम्यान प्रसारण करण्यात येईल. शाहरुखच्या आनंदासाठी त्याच्या चाहत्यांनी केलेला हा एक सुंदर प्रयत्न होता. ज्यामुळे पुन्हा एकदा किंग खान वरील चाहत्यांच्या प्रेमाची जाणीव झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे गाजवणार Rodies! सेटवरील फोटो समोर