एक्स्प्लोर

Monsoon Raises Infection Risk: पावसाळ्यात संसर्गाचा वाढता धोका! कॅन्सर रुग्ण, गर्भवती महिला अन् लहान मुलांनी कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञ सांगतात...

Monsoon Raises Infection Risk: पावसाळ्यात संसर्गाचा वाढता धोका; रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांसाठी व्यक्तींनी घ्या ही विशेष काळजी.

Monsoon Raises Infection Risk: पुणे : पावसाळा सुरू होताच ताप, सर्दी-खोकला (Health), डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस तसेच जलजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी (Monsoon) हे संसर्ग अधिक गंभीर ठरू शकतात. विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

मान्सूनमध्ये आरोग्याची कशी काळजी घ्यायची? (Monsoon Raises Infection Risk Experts Advise Extra Care)

केमोथेरपीमुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स) कमी होऊ शकतात. या पेशी शरीराला संसर्गापासून संरक्षण देतात. त्यामुळे किरकोळ वाटणारा ताप, घसा दुखणे, खोकला, जुलाब किंवा लघवी करताना होणारी जळजळ यांसारखी लक्षणेही गंभीर संसर्गाचे संकेत असू शकतात. अशा वेळी स्वमर्जीने औषधं घेण्याऐवजी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे संसर्ग टाळण्यासाठी उकळून किंवा शुद्ध केलेले पाणी पिणे, ताजे व स्वच्छ शिजवलेले अन्न खाणे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळणे आणि फळे-भाज्या नीट धुऊन वापरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पावसामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जाणे टाळतात. मात्र, केमोथेरपी किंवा फॉलो-अप तपासण्यांमध्ये खंड पडल्यास आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपचार सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.डेंग्यू, मलेरिया किंवा इतर संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास कॅन्सर रुग्णांनी विलंब न करता तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

डॉ. अभिषेक पुरकायस्थ (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव, पुणे) सांगतात की, कॅन्सर रुग्णांसाठी पावसाळ्यात सर्वात मोठा धोका म्हणजे संसर्ग. १००.४°F (३८°C) किंवा त्यापेक्षा जास्त ताप, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, जुलाब किंवा कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर अनेक रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमकुवत झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात होणारा अगदी साधा संसर्गही काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वेळेवर निदान, उपचारांचे नियमित पालन आणि डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार केमोथेरपी किंवा इतर उपचार सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही कर्करोगावरील उपचार सुरक्षितपणे आणि परिणामकारकपणे सुरू ठेवता येतात.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. संजय नगरकर म्हणाले की, पावसाळ्यात व्हायरल संसर्ग, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस तसेच दूषित पाणी व अन्नातून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढते. लहान मुलं, गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे त्यांना ताप, खोकला, जुलाब, उलट्या किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच गाळुन,उकळून थंड केलेले पाणी पिणे, ताजे व स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे आणि डासांपासून संरक्षण करणे या साध्या उपायांनी संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Embed widget