एक्स्प्लोर

Kiss Day 2023 : शरीर निरोगी राहण्यासाठी किस डे चे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Kiss Day 2023 : चुंबन घेतल्याने प्रेम वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की, चुंबन घेणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

Kiss Day 2023 : ‘व्हॅलेंटाईन वीक’ (Valentine's Week) 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. या आठवड्यात 13 फेब्रुवारीला म्हणजेच आज ‘किस डे’ (Kiss Day) साजरा केला जातो. हा व्हॅलेंटाईन वीकचा सर्वात रोमँटिक दिवस मानला जातो. या दिवशी लोक त्यांच्या जोडीदाराचे किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे चुंबन घेतात. त्यांचे प्रेम देखील व्यक्त करतात. असे मानलं जातं की, या दिवशी किस केल्याने प्रेम वाढतं. पण तुम्हाला माहित आहे का की, चुंबन घेणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

चुंबनाचे काही आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यामुळे एखाद्याच्या मनावरील तणाव दूर होतो. चुंबन करताना आपल्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन्स तयार होतं. त्यामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

तणाव-चिंतेपासून मुक्ती होते

चुंबन घेताना शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते, तेव्हा व्यक्तीला तणावमुक्तही वाटते. चुंबनासोबतच, मिठी मारणे किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणणे, यासारखे भावनिक संवाद देखील आपल्या मनोवैज्ञानिक प्रक्रियेसाठी चांगले मानले जाते.

रक्तदाब नियंत्रित राहतो

एका प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आंद्रिया डिमिर्झिओन म्हणतात, 'चुंबन आपल्या हृदयाचे ठोके वाढवून रक्तवाहिन्या विस्तृत करते. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे, रक्त प्रवाह वाढतो आणि रक्तदाब लगेच कमी होतो.’

डोकेदुखीपासून आराम मिळतो

रक्तवाहिन्या विस्तारून आणि रक्त प्रवाह वाढल्याने शारीरिक त्रासही दूर होतो. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे रक्तदाब कमी झाल्यास डोकेदुखीसारख्या समस्याही दूर होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोलेस्टेरॉल इम्प्रूव्हमेंट होते 

एका रिपोर्टनुसार, रोमँटिक किसिंगचा अनुभव शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी देखील संबंधित आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होऊ शकतो.

कॅलरी बर्न होतात

चुंबन घेताना आपल्या शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका मिनिटाच्या चुंबनाने 2 ते 26 कॅलरीज कमी होऊ शकतात. अर्थात, वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम फॉर्म्युला मानला जाऊ नये, परंतु हे खरे आहे की, यामुळे अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Valentine's Week Full List 2023: यंदा रोज डे, प्रपोज डे, किस डे कधी? जाणून घ्या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत सर्वकाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget