July 2023 Full Moon : अनेकांना चंद्राचे वेड असते. चंद्राचे स्थान प्रत्येकाच्या मनात काही खास असते. काही लोकांसाठी तो चांदोमामा असतो तर काहींसाठी तो शायरी करण्याचे प्रेरणास्थान असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत चंद्राचा प्रकाश आणि सौंदर्य पाहून अनेक लोक मंत्रमुग्ध होतात. पण पौर्णिमेच्या (Full Moon) चंद्राची बाब काही वेगळी आहे. बरेच शायर चंद्रावर शायरी बनवतात त्याच्यांसाठी जणू चंद्र म्हणजे त्यांचे एकमेव प्रेरणास्थान असते. आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे. आज आकाशाच दिसणाऱ्या चंद्राला बक मून (Buck Moon) किंवा सुपरमून (Super Moon) असे म्हणतात. काय आहे बक मून जाणून घेऊयात.


काय आहे बक मून? (What Is Buck Moon)


बक मून किंवा सुपर मून जुलै महिन्यात दिसतो. पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तो त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा आकाशात दिसतो. 3 जुलै 2023 रोजी म्हणजेच आज बक मूनचे सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्य संपूर्ण जगभरात दिसेल.


बक मून किंवा सुपनमून का म्हणले जाते?


जुलैचा सुपरमून बक मून म्हणूनही ओळखला जातो. याला बक मून का म्हणतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर याचे कारण असे की, जून-जुलै महिन्यात नर हरणांची शिंगे खूप वेगाने वाढतात आणि या काळात त्यांचा आकार सर्वात मोठा असतो. नासाच्या मते, "बक मून" हे नाव द मेन फार्मर्स पंचांगावरून देण्यात आले आहे. त्याच वेळी याला "थंडर मून" असेही म्हणतात, कारण या महिन्यात गडगडाटासह पाऊस पडतो. भारतात याला "आषाढ पौर्णिमा" किंवा "गुरु पौर्णिमा" (गुरु पौर्णिमा 2023) म्हणतात. आणि महर्षी वेद व्यास जयंती (महर्षी वेद व्यास जयंती 2023) देखील या दिवशी साजरी केली जाते.


ग्रहण तज्ञ आणि नासाचे निवृत्त खगोलभौतिकशास्त्रज्ञ फ्रेड इस्पानक यांनी Space.com ला सांगितले की सुपरमूनच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या सर्वात जवळ असतो. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्र मोठा आणि चमकदार दिसतो. आज दिसणारा सुपरमून चंद्रापासून 3,61 184 किमी अंतरावर असेल. सामान्यत: पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3, 84 400 किमी असेल.


बक मून कधी पाहता येऊ शकतो?


सुपरमून किंवा बक मून पाहण्याची सर्वोत्तम वेळ चंद्रोदय किंवा चंद्रास्त असेल. या वेळी चंद्र आकाशात सर्वात मोठा दिसेल. स्टारगेझिंग अॅप किंवा वेबसाइट च्या मदतीने तुम्ही  चंद्रोदय आणि चंद्रास्ताची वेळ शोधू शकता. आकाश स्वच्छ असल्यास तुम्हाला उघड्या डोळ्यांनी आजचा सुपरमून पाहता येईल. तसेच दुर्बिणीच्या मदतीने ही तुम्ही बक मून पाहू शकता.


बक मूनचे आध्यात्मिक महत्व काय आहे? (Spiritual Meaning Of Buck Moon)


हिंदू , बौद्ध आणि जैन धर्मात सुपरमून किंवा बक मून म्हणजे गुरू पौर्णिमा. गुरू पौर्णिमा जी आपल्या जीवनाला आकार देणारी आणि आपले जीवन योग्य मार्गाने जगण्यास मदत करणाऱ्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. गुरू पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणले जाते. या सणाला खूप महत्व आहे आणि तो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.